Skip to content

Mumbai Crime | शरद पवारांचा पदाधिकारी लोकांकडून उकळत होता लाखो रुपये

Mumbai Crime

Mumbai Crime |  मुंबईतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. शरद पवार यांच्या एक पदाधिकाऱ्याने एका महिलेची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा मुंबईच्या चारकोप परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा कार्यकर्ता असून, या आरोपीचे नाव हे ऋषी पांडे असे आहे. दरम्यान, याला फसवणुकीच्या गुन्ह्यात बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीने संबंधित महिलेची गुरुजी बनून फसवणूक केली आहे. तसेच, पोलिसांसोबत ओळख असून, तुम्हाला मदत करतो असे आश्वासन देत अनेकांकडून पैसे उकळत होता.(Mumbai Crime)

दरम्यान, याच्या विरोधात बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा आरोपी पोलिसांची दिशाभूल करत मथुरा, सोमनाथ, उज्जैन अशा विविध मंदिरांमध्ये देवदर्शन करून आता अयोध्येत जाणार असतानाच बोरिवली पोलिसांनी त्याच्या गुजरातमधून मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी पोलिस आता पुढील तपास करत आहेत.

Crime News | कपडे काढून चटके अन् मिर्चीची धुरी; अनाथ मुलींनी सांगितली आपबिती

Mumbai Crime | नेमकं प्रकरण काय..?

अधिक माहितीनुसार, बोरिवली येथे वास्तव्यास असणाऱ्या संबंधित महिलेने फेसबुकवर पोस्ट टाकलेली होती. या पोस्टमुळे वाद झाला होता. त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले. या काळातच संबंधित महिलेची ओळख शरद पवार गटाचा पदाधिकारी असलेल्या आरोपी गुरुजी उर्फ ऋषी पांडे याच्या सोबत झाली. यावेळी आरोपी ऋषी पांडे याने महिलेला “माझी पोलिसांसोबत चांगली ओळख आहे. त्यामुळे प्रकरण दडपून टाकण्यासाठी महिलेकडून पोलिसांच्या नावावर लाखो रुपयांचा चेक घेतला. मात्र, यानंतर आरोपीने महिलेला कोणतीही मदत केली नाही.

दरम्यान, यानंतर महिलेने तिचे पैसे मागितले असता, आरोपी पांडे याने महिलेचे फोन उचलणे बंद केले. यानंतर, आपली फसवणूक झाली असल्याचे महिलेच्या लक्षात येताच तिने आरोपी ऋषी पांडे याच्या विरोधात तक्रार दाखल केली. बोरिवली पोलिसांनी आरोपीच्या विरुद्ध कलम ४२० नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, सविस्तर चौकशीही सुरू आहे. (Mumbai Crime)

Sex Tips | सेक्स करताना चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी

पोलिसांचे पथक हे आरोपीच्या मागावर होते. तेव्हापासूनच आरोपी ऋषी पांडे हा पोलिसांची दिशाभुल करत, आपला मोबाईलनंबर बदलून देव दर्शनासाठी देशभरात फिरत होता. दरम्यान, या काळात आरोपीने मध्य प्रदेशमधील उज्जैन, गुजरातमधील सोरटी आणि सोमनाथ या ठिकाणी देवस्थानांना भेटी देत होता. यानंतर तो अयोध्येला जाणार होता. मात्र, त्यापूर्वीच बोरवली पोलिसांनी गुजरात सुरत त्याच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, यात आणखी कोणी सामील आहे का?, आरोपीने आणखी कोणाची फसवणूक केलेली आहे का? या बाबत पोलिस तपास करत आहे.(Mumbai Crime)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!