corruption : असा अडकला लाचखोर नरेशकुमार बहिरम अँटी करप्शनच्या जाळ्यात


corruption : मागील काही दिवसांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांमध्ये अंशतः शांतता आली होती. मात्र यातच पुन्हा एक मोठी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आली आहे. पंधरा लाख रुपयांची लाच घेत असताना नाशिकचे तहसीलदार नरेशकुमार तुकाराम बहिरम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतल आहे यामुळे महसूल विभागांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

नाशिकलाच रुचकर प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार,
राजुर बहुला या ठिकाणी एका जमिनीमध्ये मुरूम उत्खनन केलं जात होतं. या उत्खननामुळे नियमानुसार पाचपट दंड स्वामित्व धन जागा भाडे मिळून एकूण रक्कम एक कोटी पंचवीस लाख सहा हजार दोनशे वीस रुपये दंडाची नोटीस तहसील कार्यालयाकडून सदर जागा मालकाला बजावण्यात आली होती.(corruption)

या आदेशाविरोधात सदर जमीन मालकाने उपविभागीय अधिकारी नाशिक यांच्याकडे अपील केली होती. याबाबत आदेश देऊन या प्रकरणी फेर चौकशीसाठी तहसीलदार नरेश कुमार बहिरम यांच्याकडे पाठवण्यात आले. दरम्यान मिळकती मधील उत्खनन करण्यात आलेला मुरूम त्याच जागेमध्ये वापर करण्यात आला असल्याचं यावेळी जमीन मालकाकडून सांगण्यात आलं होतं.(corruption)

या कामाच्या पडताळणी साठी तहसीलदार बहिरम यांनी जमीन मालकाला त्याच्या मालकीच्या राजुर बहुला या ठिकाणी जमीन पाहणी साठी बोलावले मात्र जमीन मालक वयोवृद्ध असल्यामुळे त्यांनी त्रयस्थ व्यक्तीला त्या ठिकाणी पाठवले होते. यावेळी गौण खनिज प्रकरणातील दंडाची रक्कम माफ करण्याच्या बदल्यात तडजोडी अंती 15 लाख रुपयांचा सौदा पक्का झाला.(corruption)

दरम्यान हीच लाचेची रक्कम स्वीकारत असताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नाशिकचा लाचखोर तहसीलदार नरेश कुमार बहिरम याला रक्कम स्वीकारत असताना रंगेहात पकडले आहे.(corruption)

दरम्यान या घटनेच्या पंचनामा आपण लाच स्वीकारली असल्याचं मान्य केलं असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या सुरू आहे.(corruption)

गेल्या काही महिन्यांपासून नाशिक विभागामध्ये सर्वाधिक प्रमाणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाया केल्या असून यामध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर लाचखोरीच्या घटना समोर येत असल्याने नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर आजच्या या घटनेमुळे संपूर्ण महसूल विभागामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान कोणीही लाच मागत असल्यास किंवा याबाबत आपल्याला माहिती असल्यास ताबडतोब लाचलुचपत प्रतिबंधक विभागासोबत संपर्क साधण्याचा आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!