Nsk news: नाशिककरांचे ‘पालक’ रस्त्यावर उतरल्याने अधिकाऱ्यांची तारांबळ; खरा ‘कुटुंब प्रमुख’ मिळाल्याची उपस्थितांची भावना


Nsk news: महानगरपालिकेच्या विविध रस्त्यांची व स्मार्ट सिटीच्या रस्त्यांच्या कामाची पाहणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दादा भुसे यांनी नाशिक महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांच्या समवेत केली. यावेळी शहरातील कामांचा आढावा घेत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत कामांचा वेग वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत. यावेळी विविध कामांच्या सूचना संबंधित विभागांना करण्यात आल्या असून जनतेची गैरसोय झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल अधिकारी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल असा इशारा देखील यावेळी भुसे यांनी दिला. (Nsk news)

Bhadgaon girl rape : चिमुकलीच्या बलात्कार व हत्येनंतर भडगाव मध्ये नेमकं काय घडतंय?

मंत्री दादा भुसे यांना रस्त्यांवर बघून अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. मंत्री भुसे यांचे हे रूप पाहून जनतेने मात्र आनंद व्यक्त केला असून नाशिककरांना खरा कुटुंब प्रमुख मिळाल्याची भावना यावेळी उपस्थित नागरिकांनी बोलून दाखवली. पालकमंत्री म्हणून कारभार हाती घेतल्या नंतर भुसे यांनी आपल्या कामांचा धडाका लावला असून आज रोजी मंत्री रस्त्यावर उतरल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. (Nsk news)

यावेळी नाशिक महापालिका हद्दीतील सिटी सेंटर मॉल, त्रिमूर्ती चौक परिसरातील रस्त्यांची पाहणी करण्यात आली. या परिसरातील तसेच शहरातील रस्त्यांना पावसामुळे पडलेले खड्डयांची त्वरित डागडुजी करून खड्डे दुरुस्त करून शहर खड्डे मुक्त करण्याच्या सूचना पालकमंत्री ना.दादा भुसे यांनी दिल्या. स्मार्ट सिटी विभागाच्या वतीने चोपडा लॉन्स येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी यावेळी करण्यात आली. सदरच्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून वाहतुकीसाठी लवकरात लवकर खुला करण्याचे आदेश पालकमंत्री यांनी पहाणीच्या वेळी संबंधित विभागास दिले.

यावेळी पालकमंत्री ना. दादा भुसे यांच्या समवेत आमदार देवयानी फरांदे, प्रशासक तथा आयुक्त डॉ.अशोक करंजकर, माजी उपमहापौर अजय बोरस्ते, राजू अण्णा लवटे, शाम साबळे, सुवर्णा मटाले, दिगंबर नाडे, स्मार्ट सिटी विभागाचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, मनपा उपायुक्त श्रीकांत पवार, कार्यकारी अभियंता सचिन जाधव, जितेंद्र पाटोळे, संदेश शिंदे, उपअभियंता नितीन राजपूत हेमंत पठे, सुभाष बहिराम, आदी मनपाचे अधिकारी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!