Bhadgaon girl rape : चिमुकलीच्या बलात्कार व हत्येनंतर भडगाव मध्ये नेमकं काय घडतंय?


Bhadgaon girl rape : गोंडगाव येथे झालेल्या आमानुष घटनेच्या निषेधार्थ भडगाव तालुका बंदची हाक देण्यात आली. यात व्यापारी प्रतिष्ठानासह बाजारपेठ कडकडीत बंद करत घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

घटनेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यासह जनमानसातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. या घटनेने गोंडगावासह भडगाव तालुक्यात तणावपूर्ण शांतता आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत गजाआड केले आहे. दरम्यान गावात पोलिसांनी कडे कडे कोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

घटनेचा तपास एस आय टी कडे वर्ग

गोंडगाव येथे घडलेल्या क्रूर घटनेचा तपास एस आय टी कडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे. तसेच सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे देखील मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे.(Bhadgaon girl rape)

https://thepointnow.in/janakrosh-morcha/

मंत्र्यांसह आमदारांची पिढीत कुटुंबीयांना भेट

गोंडगाव येथे झालेल्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासह तालुक्याचे आमदार किशोर पाटील यांनी पीडित कुटुंबीयांना भेट देत त्यांचे सांत्वन केले आहे. पीडित कुटुंबीयांना वैयक्तिक आर्थिक मदत करण्यात आली. तसेच या पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करणार असल्याचे आश्वासन देखील मंत्र्यांसह आमदारांनी दिले आहे.(Bhadgaon girl rape)

गोंडगावला अनेक संघटनांसह राजकीय पदाधिकाऱ्यांची भेट

जळगाव जिल्हा सह महाराष्ट्राला हादरवणारी घटना भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे घडली आहे. या घडलेल्या घटनेमुळे अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांसह संघटनांनी पीडित कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले आहे. अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोपीला फाशीची शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

गावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

गोंडगावात पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान गावात शांतता असून पोलीस प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. दरम्यान घडलेल्या घटनेमुळे पीडित कुटुंबीयां च्या नातेवाईकांसह गावकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.(Bhadgaon girl rape)

उसाच्या कुट्टी जवळ चपला आढळल्याने घटना उघडकीस

भडगाव पोलीस स्टेशन येथे नउ वर्षीय मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली होती. दरम्यान तिसऱ्या दिवशी गावातीलच उसाच्या कुट्टी जवळ मृत मुलीच्या चपला आढळून आल्याने सदरची घटना उघडकीस आली आहे. मृता अवस्थेत मुलीचा मृतदेह आढळून आल्याने मुलीच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांनी चांगलाच हंबरडा फोडला होता.(Bhadgaon girl rape)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!