Emotional post : आणि म्हणून मी अज्ञातस्थळी जातोय ; जितेंद्र आव्हाड का झाले भावुक


Emotional post : “लोक किती स्वार्थी असतात हे मला उघडपणे लक्षात आलं आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाच्याही मानेवर देऊ शकतात. ज्यांना पोसले तेच कृतघ्न होतात. हे सगळं बघून मन अस्वस्थ झाले असल्याने मी कोणालाही भेटू इच्छित नाही. कृपया मला माफ करा.” अशी भावनिक पोस्ट करत आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घेतला आहे.(Emotional post of jitendra awhad)

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड नेहमीच आपल्या आक्रमक आणि आक्षेपार्ह विधानांसाठी चर्चेचा विषय ठरत असतात. यामुळे ते रोष देखील ओढवून घेत असतात. मात्र त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने त्यांनी केलेल्या भावनिक पोस्टने संपूर्ण राजकीय वर्तुळात ते चर्चेचा विषय ठरले असून त्यांच्या या पोस्टने सर्वांच लक्ष वेधून घेतल आहे.(Emotional post of jitendra awhad)

https://thepointnow.in/bhadgaon-girl-rape/

शरद पवार यांचे मानसपुत्र म्हणून ओळख असलेले जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधील अनेक चढ-उतार बघितले आहेत. यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याची घोषणा करत पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यामुळे भावुक झालेल्या जितेंद्र आव्हाड यांना अश्रू अनावर झाल्याचं बघायला मिळालं होतं. मात्र आपल्या आक्रमक भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या आव्हाडांना भावनिक होताना क्वचितच बघितलं गेलं आहे.(Emotional post of jitendra awhad)

5 ऑगस्ट हा जितेंद्र आव्हाड यांचा जन्मदिवस. वाढदिवसाला येणाऱ्या शुभेच्छांमुळे प्रत्येक जण भारावून जात असतो आणि यामुळे आयुष्यात काय कमावलं याची प्रचिती त्यादिवशी येत असते. याला जितेंद्र आव्हाड ही अपवाद नाहीत. मात्र, यंदा आपण कोणालाही न भेटता मोबाईल देखील बंद करणार असल्याचं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केल्याने त्यांना नेमकं झालंय तरी काय? असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे.(Emotional post of jitendra awhad)

देशात होणारी लोकशाहीची हत्या, राज्यात होणारी पक्ष फुट, मणिपूरमध्ये होत असलेले स्त्रियांवरील अत्याचार, महाराष्ट्रामध्ये दलित आणि मागासवर्गीय समाजावर वाढलेले अत्याचार आणि राजकारणाची घसरत असलेली पत ही अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. या सर्वांमुळे मी स्वतः देखील अस्वस्थ आहे आणि यातूनच मला कोणाला भेटावे असं अजिबात वाटत नाही. तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद नेहमीच सोबत आहेत. हीच माझी ताकद आहे, हीच माझी संपत्ती देखील. मात्र असं असलं तरीही मला माफ करा, मी आज रात्री बारा वाजेपासून ते उद्या रात्री बारा वाजेपर्यंत स्वतःचा फोन बंद करून अज्ञात स्थळी जाणार आहे. अत्यंत अस्वस्थ मनाने मी हे लिहत असल्याचे देखील त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!