Skip to content

Janakrosh morcha : राहुरीत हिंदू एकवटले, भव्य जन आक्रोश मोर्चा काढत केली ही मागणी


Janakrosh morcha : लव्ह जिहाद विरोधातील कायदा देशभरात लागू करण्यात यावा तसेच उमरे येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाजाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या ठिकाणी हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यामध्ये हजारोंच्या संख्येने लोक सहभागी झाले होते.(Hindu Janaakrosh morcha)

राहुरी मधील वाय एम सी एम मैदानावर घोषणाबाजी करत मोठ्या संख्येने हिंदू समाज दाखल झाला होता. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून मोठा फौज फाटा देखील तैनात करण्यात आला होता. या मोर्चामध्ये जवळपास 50 हजार हिंदू धर्मीय महिला व पुरुष सहभागी झाले असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. शुक्लेश्वर चौकापासून सुरू झालेला हा मोर्चा ग्रामीण रुग्णालयासमोर स्थिरावला यानंतर या ठिकाणी सभा देखील घेण्यात आली.(Hindu Janaakrosh morcha)

आ. नितेश राणेंची मोर्चात उपस्थिती

यावेळी उपस्थित त्यांना संबोधित करत असताना नितेश राणे म्हणाले की, देशाच्या इतिहासामध्ये हिंदूंनी कधीच पहिले दंगल घडवली नाही. हिंदू समाज कधीच कुणाच्या अंगावर जात नाही. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधानाचे कायद्याचं पालन समाज करतो. हिंदूंकडून अन्य धर्माच्या लोकांना कधीही त्रास दिला जात नाही. प्रत्येकाने आपला धर्म सांभाळावा व आम्हाला हिंदू म्हणून या देशात सुखाने जगू द्यावे.(Hindu Janaakrosh morcha)

यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडून मोर्चाला तसेच शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून राहुरी शहर परिसरात असलेल्या धार्मिक स्थळांच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. Janakrosh morcha शीघ्रकृती दलाला देखील या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं. सीसीटीव्ही द्वारे या मोर्चावर करडी नजर देखील ठेवली जात होती.(Hindu Janaakrosh morcha)

https://thepointnow.in/violence/

मागील काही महिन्यांपासून राज्यांमध्ये लव्ह ची हातच्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. अल्पवयीन तसेच तरुण हिंदू धर्मीय मुलींना विविध आमिष दाखवून त्यांचं मन परिवर्तन केलं जातं, यानंतर त्याचा धर्मांतर करून त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारायला भाग पाडलं जातं अशा घटना समोर येत असल्याने लव्ह जिहाद कायदा आणखी कठोर करण्यात यावा अशी मागणी सातत्याने केली जात आहे. याच मागणीसाठी आज राहुरी मधून हा हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता यामध्ये जवळपास 50 हजार लोकांनी सहभाग घेतल्याचं बघायला मिळालं. (Hindu Janaakrosh morcha)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!