Congress MLA | ‘त्या’ फुटीर आमदारांची नावे समोर; नाशिकच्याही एका आमदाराचा समावेश..?

0
55
Congress Cross Voting
Congress Cross Voting

Congress MLA : विधान परिषद निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला. काँग्रेस पक्षाची ७ मतं फुटल्याने महाविकास आघाडीच्या एक उमेदवाराचा पराभव झाला अशी चर्चा असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही हे मान्य केले आहे. दरम्यान, नाना पटोले यांनी गेल्या विधान परिषद निवडणुकीचा दाखला देत मागील निवडणुकीतही काँग्रेसचे काही आमदार फुटल्यामुळे चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला होता. मात्र, त्यावेळी हे फुटीर आमदार ओळखता आले नव्हते. त्यामुळे यावेळी हा संभाव्य धोका ओळखून आम्ही सापळा रचला होता. यात सापडलेल्या आमदारांवर कारवाई केली जाणार असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले.

दरम्यान, या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार झाल्याची माहिती समोर आली असून, यात काँग्रेस पक्षाची ७ मतं फुटल्याचे सांगितले जात आहे. तर, या फुटीर आमदारांमध्ये विदर्भातील १, मराठवाड्यातील ३, उत्तर महाराष्ट्रातील २ आणि मुंबईतील १ आमदाराचा समावेश असून, हे सात फुटल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेसची पाच मतं ही अजित पवार गटाला आणि इतर मतं ही भाजपला गेल्याची चर्चा आहे. कारण अजित पवार गटाकडे एकूण 42 मतं होती आणि त्यांच्या दोन्ही उमेदवारांना मिळून एकूण 47 मतं पडली. त्यामुळे अधिकची पाच मतं ही काँग्रेसची असल्याची चर्चा आहे. (Congress MLA)

Vidhan Parishad Election | काँग्रेसचे फुटीर आमदार ट्रॅपमध्ये अडकले; ‘त्या’ आमदारांवर कारवाई

या आमदारांना विधानसभेला तिकीट नाही 

दरम्यान, या संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पक्षश्रेष्ठींसोबत बोलणार असून, या फुटीर आमदारांवर कारवाई केली जाणार आहे. या आमदारांना बाहेरचा रास्ता दाखवला जाईल, असेही नाना पटोले म्हणाले होते. तर, या आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून तिकीटही न देण्याची शिफारसदेखील नाना पटोले यांच्याकडून केली जाणार असल्याचीही माहिती आहे.

Congress MLA | ‘हे’ आहेत काँग्रेसचे फुटलेले आमदार..?

  1. हिरामण खोसकर (इगतपुरी-सिन्नर मतदारसंघ)
  2. जितेश अंतापूरकर (देगलूर मतदारसंघ)
  3. मोहन हंबिर्डे (नांदेड दक्षिण मतदारसंघ)
  4. झिशान सिद्दीकी (मुंबई, वांद्रे पूर्व मतदारसंघ)
  5. सुलभा खोडके (अमरावती, मतदारसंघ)
  6. शिरीष चौधरी (रावेर, मतदारसंघ)(Congress MLA)

Vidhan Parishad election Result | मतांची फाटाफुट कुठे झाली..?; कोण ठरलं ‘मास्टर माइंड’


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here