श्री. भास्कर नेरुरकर – (हेड, हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स) – : तांत्रिक डोमेन आणि कायदेशीर करार असल्यामुळे बहुतांश इन्श्युरन्स संकल्पना या आकलनास कठीण आहेत. तथापि, जेव्हा इन्श्युरन्स कराराचा विषय येतो. तेव्हा अटी आणि शर्ती व इन्श्युरन्स विशिष्ट संकल्पना अडचणीचा विषय ठरतात. इन्श्युरन्स बाबत जागरुकता निर्माण करण्याच्या प्रयत्नात या संकल्पना निश्चितच अडसर ठरतात. माहितीपूर्ण निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला किचकट ठरु शकतील अशा सर्वसाधारण वापरातील हेल्थ इन्श्युरन्स संकल्पना खालीलप्रमाणे :
Health Insurance | हेल्थ इन्श्युरन्स संकल्पना
को-पेमेंट
को-पेमेंट म्हणजे इन्श्युअर्ड आणि इन्श्युरर यांच्यादरम्यान क्लेम रकमेची पूर्व-निर्धारित टक्केवारी सामायिक करण्याचा पर्याय होय. या पर्यायाचा वापर करण्याद्वारे हेल्थ प्लॅन खरेदी करताना प्रीमियम कमी करण्यास मदत करते. को-पेमेंट द्वारे इन्श्युररच्या दायित्वाला प्रतिबंधित केले जाते. कारण इन्श्युअर्ड त्याच्या किंवा तिच्या स्वत:च्या खिशातून एकूण क्लेम रकमेची टक्केवारी भरण्यास सहमत आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही 20% च्या को-पेमेंटशी सहमत असाल, तर ₹1, 00,000 किंमतीच्या क्लेमच्या बाबतीत तुम्हाला स्वत:च्या खिशातून ₹20,000 (₹1, 00,000 चे 20%) भरावे लागतील तर इन्श्युरर ₹80,000 च्या उर्वरित रकमेची काळजी घेईल.
कपातयोग्य
कपातयोग्य म्हणजे हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनपूर्वी इन्श्युअर्डला शिल्लक रकमेचे काळजी घेताना भार सहन करावी लागणारी विशिष्ट रक्कम होय. प्रत्येक पॉलिसीमध्ये स्वैचिक कपातयोग्यता समाविष्ट आहे. या तरतूदीमुळे इन्श्युररला त्याच्या दायित्वापासून दिलासा मिळतो. ज्यामुळे प्रीमियम मध्ये कपात करण्यास मदत होते. जितकी कपातयोग्य रक्कम अधिक तितके प्रीमियम सर्वाधिक कमी. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या पॉलिसीसाठी ₹10, 000/- कपाकयोग्य निवडल्यास, ₹1, 00,000 रुपयांच्या क्लेमच्या बाबतीत. तुम्हाला सर्वप्रथम ₹10,000 रुपयांचा भार सहन करावा लागेल. ₹90,000 बॅलन्सची काळी तुमच्या इन्श्युररद्वारे घेतली जाईल. जर क्लेमची रक्कम INR 10,000 पेक्षा कमी असेल तर कस्टमरला संपूर्ण खर्चाची जबाबदारी घ्यावी लागेल.
Health Insurance | हेल्थ इंश्योरेंस लेने से पहले आपको ‘ये’ बातें जाननी जरूरी है
डे केअर उपचार
यामध्ये 24 तासांच्या पेक्षा कमी हॉस्पिटलायझेशनच्या आत हॉस्पिटल किंवा डे केअर सेंटर मध्ये जनरल किंवा लोकल ॲनेस्थेशिया अंतर्गत केलेल्या वैद्यकीय उपचार किंवा शस्त्रक्रिया यांचा समावेश यामध्ये होतो. सर्वात महत्वाची नोंद घेण्याची बाब म्हणजे, डे-केअर उपचारांमध्ये आऊट-पेशंट उपचारांचा समावेश केला जात नाही. काही सर्वसाधारण डे केअर उपचारांत डोळ्यांची शस्त्रक्रिया, करोनरी अँजिओग्राफी, केमो थेरपी, डायलिसिस इ. बाबींचा अंतर्भाव होतो. डे-केअर उपचारांची संपूर्ण यादी तुम्हाला तुमचया इन्श्युररकडे उपलब्ध असेल आणि विशेष म्हणजे IRDAI च्या वेबसाईटवर देखील उपलब्ध असेल.
संचयी बोनस (सीबी)
प्रत्येक क्लेम फ्री वर्ष प्रीमियम मध्ये वाढ न करता तुम्हाला अधिक सम इन्श्युअर्ड अर्निंगची संधी उपलब्ध करुन देते. पहिल्या क्लेम फ्री वर्षात सम इन्श्युअर्ड मध्ये 5% आणि त्यानंतरच्या प्रत्येक क्लेम फ्री रिन्यूवल दरम्यान पुन्हा सरासरी 10 % आणि 50% पर्यंत वाढ होते. आजकाल इन्श्युरन्स रकमेच्या 100% पर्यंत सीबी असलेली प्रॉडक्ट उपलब्ध आहेत.
ग्रेस कालावधी
जर तुम्ही वेळेवर इन्श्युरन्स प्रीमियम भरण्यास विसरला असल्यास इन्श्युरन्स समान देय करण्यासाठी अतिरिक्त 30 दिवसांच्या मंजुरीला मान्यता देतो. त्यामुळे तुम्हाला लॅप्स कालावधीच्या दरम्यान कव्हर्ड केले जात नाही. एकदा प्रीमियम देय केल्यानंतर सर्व संलग्नित लाभांसह पॉलिसी पुन्हा कार्यान्वित केली जाते. ब्रेक-इन-पीरियड क्लॉज म्हणून संदर्भित या कालावधीतील क्लेम्स स्विकारले जाणार नाहीत.
हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी व नंतरचा वैद्यकीय खर्च
निदान चाचण्या, कन्सल्टेशन्स इ.साठी हॉस्पिटल मध्ये दाखल होण्यापूर्वीचा खर्च हा हॉस्पिटलायझेशन पूर्वीचा वैद्यकीय खर्च म्हणून संदर्भित केला जातो. हॉस्पिटल मध्ये दाखल केल्यानंतरच्या खर्चाला हॉस्पिटयालझेशन नंतरचा वैद्यकीय खर्च म्हणून संदर्भित केला जातो. ज्यामध्ये औषधे, चाचण्या, फिजिओथेरपी व्यायाम, डायलिसिस, केमो उपचार इ. बाबींचा अंतर्भाव होतो. हॉस्पिटल मध्ये दाखल होण्यापूर्वीचा 30 ते 60 दिवसांचा कालावधी हॉस्पिटलायझेशन पूर्वीचा (प्री-हॉस्पिटलयाझेशन) म्हणून आणि 90 ते180 दिवसांच्या दरम्यानचा कालावधी हा हॉस्पिटलायझेशन नंतरचा (पोस्ट-हॉस्पिटलायझेशन) म्हणून संदर्भित केला जातो.
वैयक्तिक अपघात
वैयक्तिक अपघात पॉलिसी ही फायदेशीर पॉलिसी आहेत. जी कोणत्याही अपघाताशी संबंधित अपंगत्व किंवा मृत्यूच्या बाबतीत एकरकमी रक्कम देतात.
Health Insurance | महिलाओं के लिए स्वास्थ्य बीमा के लाभ और कवरेज की एक विस्तृत मार्गदर्शिका
कायमस्वरुपी संपूर्ण अपंगत्व किंवा पीटीडी
जेव्हा इन्श्युअर्ड हा त्यांच्या व्यवसायाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात अक्षम किंवा दोन्ही पाय आणि हातांचे ॲम्युटेशन किंवा दृष्टीचे संपूर्ण नुकसान यांसारख्या अपरिवर्तनीय आणि कायमस्वरूपी अपंगत्वामुळे समान स्वरूपाचा पुढील रोजगार शोधण्यात अक्षम ठरतात. अशा प्रकारच्या क्लेमचे वर्गीकरण हे पीटीडी म्हणून केले जाते. आंशिक कायमस्वरुपी अपंगत्व किंवा पीपीडी तथापि, येथे शरीराचा एखादा अंग किंवा अवयवाचे न भरुन निघणाऱ्या नुकसानीचा समावेश होतो. पीपीडी ची उदाहरणे म्हणजे एक हात किंवा पाय गमावणे किंवा एक डोळा किंवा बोट गमावणे इ.
तात्पुरते संपूर्ण अपंगत्व किंवा टीटीडी
जेव्हा एखाद्याला दुखापत होते आणि तात्पुरते अपंगत्व येते. परंतु उपचारानंतर दुखापत किंवा अपघातापूर्वीची आरोग्य स्थिती पुन्हा सामान्य स्थितीत येते. तेव्हा त्याला टीटीडी असे संबोधले जाते. इजा किंवा स्थिती ही पायाचे फ्रॅक्चर किंवा हात फ्रॅक्टर किंवा कापणे यांसारख्या पूर्ववत स्थितींचा समावेश होतो
फ्री लूक कालावधी :
प्रत्येक नवीन हेल्थ इन्श्युरन्स किंवा वैयक्तिक अपघात पॉलिसीधारकाला पॉलिसी डॉक्युमेंट स्विकारल्यानंतर 15 दिवसांचा मंजूर केलेला कालावधी म्हणजे फ्री-लूक कालावधी होय. या कालावधीच्या दरम्यान संबंधित प्लॅन तुमच्यासाठी योग्य आहे किंवा नाही ठरवू शकता. जर तुम्हाला या 15 दिवसांच्या दरम्यान पॉलिसी उचित न वाटल्यास पॉलिसी कॅन्सल करू शकतात आणि प्रीमियम रिफंड केले जाईल. तथापि, कव्हर्ड केले जात असताना इन्श्युरर कडून प्रशासकीय खर्चाची आकारणी केली जाईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम