Vidhan Parishad Election | काँग्रेसचे फुटीर आमदार ट्रॅपमध्ये अडकले; ‘त्या’ आमदारांवर कारवाई

0
42
Congress Cross Voting
Congress Cross Voting

Vidhan Parishad Election |  सुरुवातीला बिनविरोध होईल असे वाटणारी विधान परिषद निवडणूक ही चांगलीच रंजक झाली. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असून, महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार उभे होते. त्यापैकी महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले असून, शरद पवार गटाच्या पाठिंब्याने उभे असलेले शेकापचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला. काँग्रेसची जवळपास आठ मतं फुटल्याने जयंत पाटील यांचा पराभव झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, यावर स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्पष्टीकरण दिले असून, मतं फुटल्याचे त्यांनी मान्य केले आहे. तर, नाना पटोले यांनी या संभाव्य फुटीर आमदारांना ओळखण्यासाठी एक सापळा रचला होता आणि या सापळ्यात अडकलेल्या फुटीर आमदारांवर आता पक्षाकडून कारवाई केली जाणार आहे.

सापळ्यात अडकलेल्या आमदारांची हकालपट्टी 

दरम्यान, यावेळी नाना पटोले यांनी आमची काही मतं फुटली असल्याचे मान्य करत याआधीच्या विधान परिषदेच्या निवडणुकीची आठवण करून दिली. या पूर्वीच्या विधानपरिषद निवडणुकीतही काँग्रेसची काही मतं फुटल्यामुळे तेव्हाचे काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाळा होता. हा दगाफटका यावेळीही होण्याचा अंदाज असल्याने हे फुटीर आमदार ओळखण्यासाठी नाना पटोले यांनी सापळा चला होता आणि या सापळ्यात अडकलेल्या आमदारांवर आता कारवाई होणार आहे. या आमदारांची आता हकालपट्टी होणार असल्याची माहिती स्वतः ना पटोले यांनी दिली आहे. (Vidhan Parishad Election)

Vidhan Parishad election Result | मतांची फाटाफुट कुठे झाली..?; कोण ठरलं ‘मास्टर माइंड’

Vidhan Parishad Election | गेल्यावेळी सापडले नव्हते, पण आता हेरले 

या निवडणुकीत आमची काही मतं फुटल्याचं सांगितलं जात आहे. या पूर्वीच्या विधानपरिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे उभे असतानाही असं प्रकार घडला होता. मात्र, त्यावेळी हे बदमाश लोकं ओळखता आले नव्हते. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन आम्ही यावेळी ट्रॅप लावला होता आणि या ट्रॅपमध्ये सर्व बदमाश आमदार सापडले आहेत. या प्रकाराबाबत याबाबत वरिष्ठांना कळवलं असून, पक्षविरोधी काम करणाऱ्या आणि पक्षाशी बेईमानी व गद्दारी करणाऱ्या आमदारांना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

Vidhan Parishad election Result | महायुतीच्या उमेदवारांचा दणदणीत विजय; कॉंग्रेसची मतं फुटली..?

काँग्रेसची कोणती आणि किती मतं फुटली?

दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेसचे आठ आमदार फुटले असून, त्यापैकी पाच आमदारांनी अजित पवार गटाला तर इतर तिघांनी भाजपला मतदान केल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसकडे एकूण 37 मतं होती. काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची 25 मतं पडली. ठाकरे गटाकडे 16 मतं होती. काँग्रेसच्या अतिरिक्त सात मतांची ठाकरे गटाला गरज होती. काँग्रेसने मिलिंद नार्वेकर यांना सहा मते दिली तर, एक मत फुटल्याची संशय आहे. अशोक चव्हाण यांच्या जवळच्या काही काँग्रेसच्या आमदारांनी व अन्य काही आमदारांनी महायुतीला मतदान केल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here