Vidhan Parishad election Result | मतांची फाटाफुट कुठे झाली..?; कोण ठरलं ‘मास्टर माइंड’

0
52
VidhanSabha Election
VidhanSabha Election

Vidhan Parishad election Result |  विधान परिषदेच्या 11 रिक्त जागांसाठी आज मतदान पार पडले असून, मतमोजणी सुरू आहे. यात आतापर्यंत पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी झाली आणि यात महायुतीच्या सर्व 9 उमेदवारांचा विजय झाला आहे. भाजपचे पाच, अजित पवार गटाचे दोन आणि शिंदे गटाचे दोन अशा महायुतीच्या 9 उमेदवारांनी 23 मतांचा कोटा पूर्ण करत विजय मिळवला. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे निश्चितच एका उमेदवाराचा पराभव होणार होता. मात्र, तो उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते.

आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार अजित पवार (Ajit Pawar) गटाकडे एकूण 42 मतं होती. मात्र, त्यांच्या दोन्ही उमेदवारांना मिळून 47 मतं पडली. त्यामुळे कॉंग्रेसची पाच मतं ही अजित पवार गटाने फोडल्याचे दिसत आहे. सर्वात कमी मतं ही शेतकरी कामगार पक्षाचे आणि शरद पवार गटाच्या पाठिंब्याने मैदानात उतरलेले जयंत पाटील (Jayant Patil) यांना मिळालेली आहेत. तर, आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार कॉंग्रेसची मतं फुटल्याचे दिसत आहे. (Vidhan Parishad election Result)

Vidhan Parishad election Result | महायुतीच्या उमेदवारांचा दणदणीत विजय; कॉंग्रेसची मतं फुटली..?

Vidhan Parishad election Result | मतांची फाटाफुट कुठे झाली..?

कॉंग्रेसकडे एकूण 37 मतं होती. कॉंग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना 25 मतं मिळाली. त्यानंतर कॉंग्रेसकडे 12 मतं शिल्लक होती. ठाकरे गटाकडे 17 मतं असल्याने मिलिंद नार्वेकरांना अधिकच्या 7 मतांची गरज होती. त्यासाठी कॉंग्रेसच्या अधिकच्या मतांची मागणी ठाकरेंनी केली. पण प्रत्यक्षात नार्वेकरांना आतापर्यंत केवळ 22 मतं मिळाली. म्हणजेच कॉंग्रेसची 7 मतं फुटली.

शरद पवार गटाकडे 12 मतं होती आणि शरद पवारांनी जयंत पाटील यांना पाठिंबा दिल्याने त्यांची मतं ही जयंत पाटलांना गेली असून, त्यांना आतापर्यंत बरोबर 12 मतं पडली. तर, अजित पवार गटाला 5 मतं अधिक मिळाली. म्हणजेच कॉंग्रेसचे पाच मतं ही अजित पवार गटाकडे गेल्याचे स्पष्ट आहे. दुसरीकडे भाजपकडे 115 मतं होती. मात्र, उमेदवारांना 118 मतं मिळाली. भाजपला कॉंग्रेसची दोन मतं आणि इतर आमदाराचं एक मत अशी तीन मतं अधिक मिळाली. म्हणजेच कॉंग्रेसची सात मतं फुटली.

Vidhan Parishad election | एक आमदार रुग्णालयातून तर, एक तुरुंगातून मतदानासाठी दाखल

कोणत्या उमेदवाराला किती मतं..? 

पंकजा मुंडे (भाजप) – 26
सदाभाऊ खोत (भाजप) -26
परिणय फुके (भाजप) – 26
अमित गोरखे (भाजप) – 26
योगेश टिळेकर (भाजप) – 26
शिवाजीराव गर्जे (अजित पवार गट) – 24
राजेश विटेकर (अजित पवार गट) – 23
भावना गवळी (शिंदे गट) – 24
कृपाल तुमाने (शिंदे गट) – 25
मिलिंद नार्वेकर (ठाकरे गट) – 22
प्रज्ञा सातव (कॉंग्रेस)  – 25
जयंत पाटील (शेकाप) – 12


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here