CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकच्या दौऱ्यावर असून नांदगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे त्यांच्या हस्ते लोकार्पण पार पडणार आहे. नांदगावमध्ये आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नांनी उभारण्यात आलेला आशिया खंडातील शिवसृष्टी मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात मोठ्या अश्वारूढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकांच्या लोकार्पण पार पडणार आहे. त्यानंतर नांदगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मुख्यमंत्र्यांची सभा पार पडणार आहे. या दौऱ्यानिमित्त नाशकात जय्यत तयारी करण्यात आली आहे.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी हे या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासोबतच संगीतकार व गायक अवधूत गुप्ते, गायका वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर यांच्या गायनाचा कार्यक्रमाही आयोजित करण्यात आला आहे.
CM Eknath Shinde | काय आहेत शिवसृष्टीची वैशिष्ट्ये?
* 31 फूट उंची असलेला ब्रॉंझ धातूचा अश्वारूढ पूर्णाकृती असलेला पुतळा 20 फुटाच्या चौथ्यावर बांधण्यात येणार आहे.
* शिल्पकारांना हा पुतळा बनवण्यासाठी जवळजवळ एक वर्षांचा कालावधी लागला आहे.
* पुतळा सभोवती कारंजे आणि नैसर्गिक हिरवळीचे उद्यान आहे.
* साडे पंधरा मीटर उंचीचे भव्य प्रवेशद्वार बनवण्यात आले आहे.
* छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या विविध कथा म्युरल चित्राच्या माध्यमातून अनुभवता येणार आहेत.
* शिव चित्रपट गृह या संकल्पनेतून एक मिनिट थिएटर बांधण्यात आले आहे.
* शिवरायांचे युद्ध कौशल्य व आरमारासंदर्भात प्रेरणा देणारे प्रसंग दाखवण्यात येणार आहेत.
* जॉगिंग ट्रॅक उद्यान व्यायामाची साधने ॲम्पी थिएटर इत्यादी सुविधा उपलब्ध असणार आहेत.
CM Eknath Shinde | ‘शिवरायांच्या चरणी मस्तक ठेऊन माफी मागतो पण…’; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना आवाहन
आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते अभिषेक सोहळा पार पडणार.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसृष्टीतील अश्वारूढ पुतळ्याच्या अभिषेक सोहळ्यासाठी सप्त नद्यांसह चारीधाम वरून आणलेले पवित्र जल, पंचामृत, गुलाब जल, 51 लिटर शुद्ध दूध आणि 121 पुरवतांनी मंत्रोच्चार केलेले विविध पौरोहित्य यांनी अभिषेक घातला जाणार आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आशिया खंडातील सर्वात मोठ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शिवसृष्टी येथे लोकार्पण पार पाडणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम