नाशिक : ओबीसी संघर्ष समिती आयोजित सुवर्णकार समाजाचा सर्वशाखीय वधू- वर परिचय मेळावा कोहिनुर इंग्लिश स्कूलमध्ये उत्साहात पार पडला. तसेच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना ओबीसी १२ बलुतेदार यांचे ‘राजे’ म्हणून त्यांना सुवर्णकार समाजातर्फे स्मृतिचिन्ह देण्यात आले. यावेळी वर्तमान काळातील परिस्थतीमध्ये ओबीसी समाजाने एकत्रित येऊन व्यवस्थेमध्ये अस्तित्व दाखण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मेळावास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या ओबीसी समाजाचे संघटक बाळासाहेब कर्डक यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर समता परिषेदेचे दिलीप खैरे, आयोजक गजू घोडके, अखिल भारतीय सुवर्णकार समाजाच्या अध्यक्षा पुष्पा सोनार, शाम बिरारी, प्रकाश थोरात, संजय मंडलिक, जितेंद्र भावे, मिलिंद सोनार, कौशल वाघरकार, दिलीप सोनार, रवी मैंद, कृष्णा बागुल, नाना पवार, राजेंद्र शहाणे, राजाभाऊ दिंडोरकर, राजेंद्र कुलथे,चारुहास घोडके, भास्कर मैंद आदी उपस्थित होते.(Chhagan Bhujbal)
OBC Reservation | तुम्ही एक भुजबळ पाडा, आम्ही १६० मराठे पाडू; ओबीसी नेत्यांचा एल्गार
जितेंद्र भावे, दिलीप सोनार, मिलिंद सोनार,राजेंद्र कुलथे ओबोसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांना ‘ओबोसी राजे’ असलेली प्रतिकृती देण्यात आली. तसेच यापुढे सुवर्णकार समाजातील सर्व नागरिकांनी आपल्या आडनावापुढे सोनार लावावा, असा ठराव मंजूर करण्यात आला.
यावेळी गजूभाऊ घोडके यांना समाज भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी अहिर सुवर्णकार, लाड सुवर्णकार, देशस्थ सुवर्णकर पोट शाखेतील 100 उप वधू – उपवरांचा परिचय करून देण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किरण सोनार आणि प्रतिभा सोनार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाळासाहेब दुसाने, अर्चित घोडकेआणि इतरांनी परिश्रम घेतले.(Chhagan Bhujbal)
Chhagan Bhujbal | गोडसेंवर ओबीसी समाज नाराज; मतपेटीत ताकद दाखवणार
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम