Skip to content

OBC Reservation | तुम्ही एक भुजबळ पाडा, आम्ही १६० मराठे पाडू; ओबीसी नेत्यांचा एल्गार

OBC Reservation

OBC Reservation | राज्यात सध्या जातीय राजकारण हे पेटल्याचे दिसत आहे. एकीकडे मनोज जरांगे हे मराठा समाजाला ओबीसीतूंनच आरक्षण मिळावे यावर ठाम आहेत. तर, दुसरीकडे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू न देण्याच्या मुद्द्यावर ठाम आहेत. यातून आता ओबीसी विरुद्ध मराठा आणि भुजबळ विरुद्ध जरांगे पाटील हा वाद उद्भवला आहे. हे दोघेही सध्या राज्याच्या वेगवेगळ्या भागांत समाजाच्या सभा घेत आहेत. दरम्यान, काल छगन भुजबळांचा ‘ओबीसी एल्गार मेळावा‘ हा पंढरपूरात पार पडला. (OBC Reservation)

OBC Reservation | पुढचा खासदार ओबीसीचाच 

दरम्यान, यावेळी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेवरून ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी जरांगेंना थेट इशाराच दिला आहे. ते म्हणाले की, “तुम्ही जर १ भुजबळ पाडलात, तर आम्ही १६० मराठे पाडू. आणि माझं हे वाक्य गड्यांना लयीच लागलंय. आम्हाला फोन करत्यात, आमचं नाव हे तुमच्या यादीत आहे काय? या सोलापूरात एक-दोन सोडले, तर सगळे मराठेच, खासदार, आमदार, जिल्हा परिषदेला सगळे मराठेच आहेत. मात्र, आता हे चालणार नाही. आता हे चालवायचं आहे का? आता आपलेच आमदार आणि आपलेच खासदार. अंत पुढचा माढ्याचा खासदार हा ओबीसीचाच”, असं यावेळी प्रकाश शेंडगे म्हणाले.(OBC Reservation)

OBC sabha | ओबीसी सभेला जाणाऱ्या भुजबळांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न

ओबीसीतूनच आरक्षण घेऊ अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचे आरक्षण आहेच. तुम्हाला हॉस्टेल दिलं, कर्ज दिलं, सगळं दिलं. तरीही म्हणताय की मुंबईत येणारच, मात्र त्याआधीच आता मुंबईत आम्ही जाऊ. मुंबईत ५० लाख ओबीसी समाज आहे. तिथल्या सगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये आमचेक भटके-विमुक्त लोकं आहेत. त्यांनी जर एक दिवस जरी रजा घेतली तर अक्खी मुंबई पॅक करण्याची ताकद ओबीसींमध्ये आहे.”, असा इशारा यावेळी प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.(OBC Reservation)

OBC Sabha | जालन्यात आज ओबीसींचा एल्गार; या आहेत मागण्या

OBC Reservation | येत्या २० तारखेला आंदोलन

“यांच्या शिंदे समितीचा जीआर हा अगदी रात्री अडीच वाजताही काढला जातो. आणि असाच रात्री-बेरात्री कधी आमचा घात होऊ नये, म्हणूनच आपल्याला आता येत्या २० तारखेला आंदोलन करावं लागणार आहे. ही रात्र वैऱ्यांची आहे. म्हणून आता आपल्याला सावध राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्या तीन-तीन निवृत्त न्यायमूर्तींची एक समिती. आणि त्यांचा पगार चार-पाच लाख. त्यांना पाहिजे तेवढे वकील, आम्ही अर्ज केला की, आम्हाला वकिलांची गरज असेल. मात्र, तेव्हा त्यांना परवानगी लागते”, अशी टीका यावेळी शिंदे समितीवर प्रकाश शेंडगे यांनी केली. (OBC Reservation)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!