सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जनता विद्यालय पिंपळगाव (वा.) या शाळेने नुकत्याच लोहोणेर येथे पार पडलेल्या म.वि.प्र. समाजाच्या तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत उज्वल यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे. लोहणेर (ता.देवळा) येथे झालेल्या या ‘म.वि.प्र.सांस्कृतिक महोत्सव’ अंतर्गत संपन्न झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी समूह गीत, वैयक्तिक गीत गायन, वैयक्तिक वाद्य वादन आणि समूहनृत्य अशा विविध स्पर्धा प्रकारात उस्फूर्त सहभाग नोंदवला.(Deola)
यात समूहनृत्य या प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. तर, त्यांची जिल्हास्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठीही निवड झाली आहे. त्याचप्रमाणे वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत चांदवडे गायत्री या विद्यार्थिनीस उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. तर वैयक्तिक वाद्य वादन स्पर्धेत साई अनिल खैरनार, ललित थोरात ह्या विद्यार्थ्याना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.(Deola)
Deola News | चिंचवे (निं) विकास सोसायटीच्या चेअरमन पदी विश्वास वाघ
सर्व विजेत्या स्पर्धकांचे देवळा तालुका संचालक विजय पगार, गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव, उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष दिलीप पाटील, माध्यमिक समितीचे अध्यक्ष एन.डी.पाटील आणि सर्व सदस्य, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस.एम.आहेर, पर्यवेक्षक आर.एच.देसले, लोहोणेर विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.के.जाधव, ‘मविप्र’ सेवक सोसायटीचे संचालक मनिष बोरसे, सांस्कृतिक समिती प्रमुख आर.एस.निकम, मार्गदर्शक शिक्षिका रोहिणी आहेर, शितल देवरे, जयश्री बिरारी, प्रियंका बच्छाव विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.(Deola)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम