राम शिंदे : प्रतिनिधी – सर्वतीर्थ टाकेद | संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द असलेल्या सह्याद्री पर्वत रांगेत निसर्ग सौंदर्याने नटलेल्या भंडारदरा परिसरातील काजवा महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ३० ते ३५ हजार पर्यटकांनी हजेरी लावली. गडद अंधारात लुकलूकणारे चमकणारे काजवे पाहून पर्यटकांच्या डोळ्यांची पारणे फिटले. हिरडा बेहडा व सादडा यांसारख्या झाडांवर हजारोंच्या संख्येने काजवे दिसले. हे काजवे एका लयात लुकलूकले अन झाडांवर जणू काही दिव्यांची माळच दिसावी तसे दृश्य पर्यटकांना बघावयास मिळाले.
काजवा महोत्सवासाठी हरिश्चंद्र गड (Harishchandra gad), भंडारदरा (Bhandardara), कळसुबाई (Kalsubai) घाटघर अभयारण्यात वन्यजीव विभागाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी 25 मे ते 15 जून या कालावधीत या काजवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या मुरशेत, पांजरे, उडदावणे, घाटघर, साम्रद, रतनवाडी, कोलटेम्भे, मुतखेल, शिंगणवाडी, लव्हाळवाडी परिसरात काजवे बघण्यासाठी पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळाली. यावर्षी काजवा महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शांत काळ्याभोर अंधारात लुकलुकणाऱ्या काजव्यांचा आविष्कार बघण्यासाठी भंडारदरा परिसरात ३० ते ३५ हजार पर्यटकांनी हजेरी लावली.(Kajwa Mahotsav)
Kajwa Mahotsav | काजवा महोत्सव होणार हाऊस फुल्ल; नेमका काय आहे काजवा महोत्सव..?
दुपारी ३ वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या. वन्यजीव विभागाच्या वतीने ठिकठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. काजवा महोत्सवामुळे स्थानिक हॉटेल टेंट धारकांसह रानमेवा विकणाऱ्या बेरोजगार आदिवासी बांधवांना चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे. वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी डी.डी.पडवळे, वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे, वनपाल एस.पी.लांडे, एच.एन ईदे, डी.एस.मुठे, आर.जी बुळे, आर.एस. कुवर, पाटोळे, वनरक्षक ही.बी तळपाडे, महेंद्र पाटील, व्ही.पी चव्हाण, पी.व्ही.साळुंके, एफ.व्ही.भोये, जी.आर.आढळ, गुलाब दिवे, संदीप पिचड, डी.आर.डंबाळे, व्ही.एस खाडे, अनिता शिंदे, निलेश पिचड, प्रकाश आढळ, राजेंद्र चौधरी, जी.बी.पालवे, आकाश धोंगडे, वन्यजीव विभागाचे सर्व कर्मचारी काजवा महोत्सव यशस्वी होण्यासाठी मेहनत घेत आहे.(Kajwa Mahotsav)
Kajwa Mahotsav | वन्यजीव विभागाचा निर्णय; काजवा महोत्सवाला रात्री ९ नंतर प्रवेश नाही
पर्यटकांची होणार नोंद :
काजवा महोत्सवाला येणाऱ्या पर्यटकांना संध्याकाळी ७ ते ९ असा वेळ देण्यात आला आहे. आरडाओरडा ,मद्यपान करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. मद्यपी व गोंधळ घालणाऱ्यांवर कडक व दंडात्मक कारवाई करण्यात येईल.सर्वांनी नियमांचे पालन करावे.टेंटधारकांनी पर्यटकांना योग्य माहिती द्यावी,तसेच आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकांची रजिस्टर नोंद घ्यावी असे वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी डी. डी.पडवळे यांनी सांगितले.(Kajwa Mahotsav)
पर्यटकांनी काळजी घ्यावी :
येणाऱ्या पर्यटकांनी काजवा महोत्सवाचा आनंद घ्यावा. काजवा महोत्सव बघण्यासाठी परिवारासह येतात आपल्यामुळे कुणाच्या आनंदावर विरजण पडणार नाही. याची काळजी प्रत्येक पर्यटकाने घ्यावी, असे आवाहन वन्य जीव विभागाने केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम