Indurikar Maharaj | प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकार इंदुरीकर महाराज हे नेहमी त्यांच्या किर्तनातील विनोदी शैलीमुळे आणि वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. दरम्यान, इंदुरीकर महाराज यांच्यावर PCPNDT या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आपत्य प्राप्ती संबंधित इंदुरीकर महाराज यांनी फेब्रुवारी २०२० मधील त्यांच्या एका कीर्तनात वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांच्यावर जुलै २०२० मध्ये PCPNDT या कायद्याअंतर्गत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस ) गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आज संगमनेर जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. परंतु या सुनावणीसाठी स्वतः इंदुरीकर महाराज हजर राहणार का? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेत, अंनिसच्या कार्यकर्त्यांनी इंदुरीकरांवर कारवाईची मागणी केलेली होती. मात्र जिल्हा न्यायालयाने इंदुरीकर महाराजांना गुन्ह्यातून मुक्त केल्यानंतर अंनिसने छत्रपती संभाजी नगर उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
BIG NEWS | २५ टक्के कमिशनची मागणी करतांय सरपंच आणि ग्रामसेवक
कोण आहेत इंदूरीकर महाराज ?
निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ निवृत्ती महाराज आणि इंदुरीकर महाराज नावाने लोकप्रिय असे, हे महाराष्ट्रातील एक कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्यांचे मुळ गाव आहे. या गावाच्या नावावरूनच ‘इंदोरीकर’या शब्दाचा ‘इंदुरीकर’ असा अपभ्रंश होऊन त्यांचे ‘इंदुरीकर महाराज’ असे नाव पडले आहे. समाजात घडत असलेल्या चुकीच्या गोष्टींवर प्रकाश टाकण्याचे काम इंदुरीकर महाराज त्यांच्या कीर्तनाद्वारे विनोदी शैलीतून टीका करतात.
नाशिक सारखं शहर उध्वस्त होणार असेल तर… राऊतांचा इशारा
काय आहे प्रकरण ?
‘सम तारखेला स्त्रीसंग ठेवल्यास मुलगा आणि विषम तारखेला स्त्रीसंग ठेवल्यास मुलगी होते,’ असं वादग्रस्त विधान इंदुरीकर महाराजांनी फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांच्या एका कीर्तनात केलं होतं. त्याविरोधात अहमदनगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अंनिसने खटला दाखल केला होता. सत्र न्यायालयाने हा खटला रद्द करण्याचा आदेश दिल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उच्च न्यायालयात धाव घेतलेली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ॲड.रंजना गवांदे यांनी ॲड.जितेंद्र पाटील यांच्यासह याचिका दाखल केलेली होती. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेलं होतं.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम