Skip to content

शेती विकून विठूराया चरणी २६ तोळ्यांचा सोन्याचा करदोडा; अशी महिला भक्त आहे तरी कोण?


Pandharpur | शेती विकून आलेल्या पैशातून एका महिलेने तब्बल २६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने विठूरायाच्या चरणी दान केलेले आहे. ह्या महिलेच्या दानशूरपणाची चर्चा पंचक्रोशीत रंगलेली आहे. धाराशीव जिल्ह्यातील या महिलेने पंढरपुरात श्रीविठ्ठल मंदिरात २५.५ तोळे वजनाचा सोन्याचा करदोडा दान केलेला आहे. तर रुक्मिणी मातेला जवळपास दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण केलेले आहे. याची एकत्रित किंमत १८ लाख रुपये इतकी होते.

Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

विठूरायापासून तुळजाभवानी, अंबाबाईपर्यंत आणि लालबागचा राजापासून सिद्धिविनायकपर्यंत लाडक्या देवाच्या चरणी दानधर्म करणाऱ्या भक्तांची महाराष्ट्रात कमी नाही. फक्त राज्यातूनच नव्हे, तर देश-परदेशातून मोठमोठ्या दानाचा ओघ महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रांना होताना दिसत असतो. पंढरपुरातील सावळ्या विठ्ठलाच्या चरणीही एका आजीबाईंनी दान दिलेलं आहे. विशेष म्हणजे शेती विकून त्यांनी जणू आपलं सर्वस्वच देवाचरणी अर्पण केलेलं आहे.

BIG NEWS | २५ टक्के कमिशनची मागणी करतांय सरपंच आणि ग्रामसेवक
“मला माझ्या विठुराया शिवाय आहे तरी कोण?” असे म्हणत आजीबाईंनी दान केलेलं आहे. श्रीमती बाई लिंबा वाघे असे या महिला भक्ताचे नाव आहे. शेती विकल्यानंतर आलेल्या पैशांतून त्यांनी देवाला २६ तोळे सोन्याचा करदोडा अर्पण केलेला आहे. श्रीमती बाई लिंबा वाघे या धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी गावच्या रहिवासी आहेत. वाघे आजींनी श्री विठ्ठलास २५५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा करदोडा आणि श्री रूक्मिणी मातेस १९ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र अर्पण केलेलं आहे. या अर्पण केलेल्या वस्तू १७ लाख ९९ हजार ३९९ रुपये किमतीच्या आहेत. मंदिर समितीच्या वतीने श्रीमती बाई लिंबा वाघे यांचा सत्कार आस्थापना विभाग प्रमुख विनोद पाटील यांचे हस्ते साडी उपरणे आणि श्री विठ्ठल रूक्मिणीची प्रतिमा देऊन करण्यात आलेला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!