Skip to content

BIG NEWS | २५ टक्के कमिशनची मागणी करतांय सरपंच आणि ग्रामसेवक


BIG NEWS | पुण्यातील टाकवे ग्रामपंचायत हद्दीत पूर्ण केलेल्या रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी सरपंच आणि ग्रामसेवक पंचवीस टक्के कमिशन मागत आहेत. या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे पत्र ठेकदाराने व्हायरल केल्याने पुण्यात खळबळ उडालेली आहे. पुणे जिल्ह्यातील टाकवे ग्रामपंचायतीत हा सर्व प्रकार घडलेला आहे. (BIG NEWS)
टाकवे ग्रामपंचायत हद्दीत पंधराव्या वित्त आयोगानुसार ड्रेनेजलाइन रस्ता कॉंक्रिटीकरण करण्याचे काम अक्षय राठोड यांना दिलेले होते. त्यांनी हे काम ठेकेदार महेश आढे यांना दिलेले होते. त्यांनी हे काम पूर्णदेखील केले आहे. या कामाचे बिल काढण्यासाठी ठेकेदार महेश आढे तीन महिन्यांपासून पाठपुरावा करत आहेत. परंतु, बिलाच्या रकमेतील पंचवीस टक्के रक्कमेची सरपंच आणि ग्रामपंचायत मागणी करत असल्याने या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा निर्णय घेत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या नावाने सुसाइड नोट (Suicide Note) व्हायरल केलेली आहे.

आत्महत्येला सरपंच आणि ग्रामसेवक जबाबदार राहतील, असे या सुसाइड नोटमध्ये महेश आढे यांनी नमूद केलेले आहे. या सुसाइड नोटमुळे टाकवे ग्रामपंचायत आणि परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आलेले आहे. टक्केवारी घेणे म्हणजे गावाचा विकास खुंटत असतो. आपल्या गावाचा विकास कसा होईल? याकडे प्रशासनाने लक्ष द्यायला हवे, असे ग्रामस्थांनी म्हटले आहे. ग्रामसेवक आणि सरपंच यांनी लाच घेतली नसेल तर त्यांना घाबरण्याचे काहीही कारण नाही. त्यांनी लगेच प्रसारमाध्यमांकडे यायला हवे होते. या सर्व प्रकरणाच्या चौकशीची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केलेली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!