Skip to content

नाशिक सारखं शहर उध्वस्त होणार असेल तर… राऊतांचा इशारा


नाशिक| शहर ड्रग्स माफियांचा अड्डा बनलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक शहर वेगवेगळया कारणाने राज्यात चर्चेत आलेले आहे. उडता पंजाब सारखं उडता नाशिक होतंय की काय? अशी चिंता आता वाढू लागलेली आहे. ड्रग्स माफियांचे आणि नाशिकचे संबंध चांगलेच चर्चेत आलेले आहेत. नाशिकमधील या सर्व बातम्या आम्हाला अस्वस्थ करण्याऱ्या आहेत. शहरातील गावच्या गावं ड्रग्सच्या विळख्यात येताना दिसताय.

Pune | PSIने दीड कोटी जिंकले; मात्र आता वाढणार अडचणी…नेमकं घडलं काय ?

पोलिसांचीसुद्धा या प्रकरणात मिलीभगत

शहरातील पोलीससुद्धा ड्रग्स माफियांच्या या धंद्यात सामील आलेत. पोलिसांच्या सहकार्याशिवाय शहरात एवढे मोठे ड्रग्स रॅकेट कसे चालते? पोलीसप्रशासनात आणि राजकारणात ड्रग्स मफियांचे हफ्ते कुठे कुठे जात आहेत हे आम्ही नक्की शोधणार असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिलेला आहे.

 

या परिस्थितीला नाशिकचे पालकमंत्री जबाबदार

नाशिकचे पालकमंत्री आणि भावी इच्छुक पालकमंत्री तसेच माझी पालकमंत्री या सर्व परिस्थितिला जबाबदार असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे. तसेच नाशकातील सर्व नेते या ड्रग्स माफियांना पोसत असल्याची घणाघाती टिका देखील राऊतांनी केलेली आहे. काल सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, जेव्हा जेव्हा फडणवीस गृहमंत्री असतात तेव्हा तेव्हा नागपूरची गुन्हेगारी वाढते. पण यात अर्धसत्य आहे. जेव्हा जेव्हा फडणवीस गृहमंत्री असतात तेव्हा तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राची गुन्हेगारी वाढते हा माझा आरोप आहे, असं म्हणत संजय राउतांनी फडणवीसांवर जहरी आरोप केलेला आहे. जर असच सुरू राहिलं तर पालकमंत्री दादाजी भुसे यांना राजीनामा द्यावा लागेल असा थेट इशाराच राउतांनी दिला आहे.

Raj Thackeray : जुन्या 44 टोलनाक्यांचं काय? राज ठाकरेंचा सरकारला सवाल

नाशिकमध्ये शिवसेना विराट मोर्चा काढणार

नाशिकमधील ड्रग्स माफियांविरोधात शिवसेना आवाजच उठवणार नाही तर आंदोलन देखील करणार असल्याचा इशारा राऊतांनी दिलेला आहे. येत्या २० तारखेला नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेना विराट मोर्चा काढणार आहे. या मोर्चात शहरातील नागरिक, पालक, शिक्षक तसेच जागरूक नागरिकांनी सहभागी व्हावे असं आवाहन देखील खासदार संजय राऊत यांनी केलेल आहे. नाशिक सारखं शहर उध्वस्त होणार असेल तर त्यासाठी शिवसेना नक्की उभी राहणार अशी ग्वाही देखील राऊतांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!