Pune | PSIने दीड कोटी जिंकले; मात्र आता वाढणार अडचणी…नेमकं घडलं काय ?

0
2

Pune | पुण्यातील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे हे गेल्या दोन दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. Dream 11 या ऑनलाइन गेममधून त्यांनी दीड कोटी रुपये जिंकले आहे. पण या दीड कोटींमुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. सर्व प्रशासकीय व कायदेशीर गोष्टी तपासून त्यांच्यावर करावाई करण्यात येणार आहे. मग सोमनाथ झेंडे यांची चौकशी करण्यात येणार आहे अशी माहिती जनसंपर्क अधिकारी सतीश माने यांनी दिलेली असून या सगळ्याचा तपास पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्याकडे देण्यात आलेला आहे. त्यामुळे झेंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. (Pune)

Nashik | नाशिकमधील आंदोलनातून कंत्राटी शिक्षकांचा पेटला प्रश्न

सोमनाथ झेंडे यांनी बांगलादेश व इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यासाठी Dream 11 वर टीम लावलेली होती. हा सामना संपल्यानंतर सोमनाथ झेंडे यांनी त्यांचा मोबाईल चेक केला असता त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं होतं. दीड कोटी जिंकल्यानंतर PSI करोडपती झाले आहेत. त्यामुळे त्यांचे कुटुंबदेखील खूश झालेलं आहे. तरीही ऑनलाईन गेमिंग धोकादायक असल्याचं PSI झेंडे यांनी सांगितलेलं आहे. अशा गेम्सपासून आपल्याला सावध राहायला हवं कारण याचे व्यसन लागून आर्थिक नुकसानही होऊ शकते, असं आवाहन PSI झेंडे यांनी केलं आहे.

PSI झेंडे यांनी दीड कोटी रुपये जिंकल्यानंतर भाजपचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही मागणी करत यासंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र व्यवहार केलेला आहे. त्यानंतर पुण्यातील पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत. संपूर्ण चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलेले आहेत.

Crime | वाढदिवसाच्या केकवरुन वाद; मित्रानेच मित्राचा केला घात

सोमनाथ झेंडे नक्की कोण आहेत ?

PSI सोमनाथ झेंडे हे मूळचे पुणे जिल्ह्यातील जेजुरी गावचे रहिवासी आहेत. गेल्या १५-१६ वर्षांपासून ते प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. त्यांना ऑनलाइन गेममध्ये दीड कोटी रुपये मिळाल्याने कुटुंबीय आनंदात आहेत. परंतु आता चौकशीचा ससेमिरा मागे लागणार असल्याने PSI झेंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here