BIG NEWS! मराठा क्रांती मोर्चा आता आक्रमक; 14 ऑक्टोबरच्या सभेपूर्वीच जरांगेंना धक्का

0
1

BIG NEWS :  मुंबईतुन मोठी बातमी आता समोर येत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलेलं आहे. एकीकडे मराठा समाजाला कुणबी समाजाचं प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. तर मराठा क्रांती मोर्चा आता आक्रमक झालेला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुंबईमध्ये आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. मराठ्यांना कुणबीतुन नको तर मराठा म्हणूनच आरक्षण द्या अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आलेली आहे. आता आंदोलकांमधून मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात सूर उमटताना दिसत आहे.

Pune | PSIने दीड कोटी जिंकले; मात्र आता वाढणार अडचणी…नेमकं घडलं काय ?

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या आपल्या मागणीसाठी जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं. मराठा समाजाला चाळीस दिवसांच्या आत आरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केलेली आहे. मराठा समाजाला कुणबी समाजाचे प्रमाणपत्र द्यावं अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यभरात त्यांचे दौरेदेखील सुरू आहेत, येत्या 14 ऑक्टोबरला त्यांची अंतरवाली सराटीमध्ये विराट सभा होणार आहे. मात्र या सभेपूर्वीच त्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मुंबईत मोर्चा काढण्यात आला आहे.

काय आहे मागणी?

आम्हाला कुणबीमधून नको तर मराठा म्हणूनच आरक्षण द्या अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे. त्यासाठी आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मुंबईत आंदोलनाला सुरुवात झाली आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी समाजातून आरक्षण द्या अशी मागणी केली आहे, मात्र दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चा कडून याला विरोध होत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here