Raj Thackeray | राज्यातील टोलनाक्यावर ज्या लोकांची वसुलीसाठी नियुक्ती केली जाते त्यांची पार्श्वभूमीवर तपासली जाणार आहे. याशिवाय त्या लोकांची नियुक्ती होणार नाही. या सगळ्यासाठी आदेश दिले जाणार आहेत. तसेच प्रवाशांशी सौजन्याने वागवे असं देखील सांगण्यात येणार आहे, असं नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलेलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्यात टोलनाक्याबाबतची चर्चा यशस्वी झालेली आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. या बैठकीनुसार महाराष्ट्रातील जुने 44 टोलनाके बंद करण्यात येणार आहेत. यावर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महिन्याचा अवधी मागितलेला आहे, अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे.
BIG NEWS! मराठा क्रांती मोर्चा आता आक्रमक; 14 ऑक्टोबरच्या सभेपूर्वीच जरांगेंना धक्का
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी टोलवसूलीच्या मुद्द्यावर चर्चा झाली होती. त्यानंतर आज पुन्हा राज ठाकरे आणि राज्याचे सार्वजनिक मंत्री दादाजी भुसे यांच्यात बैठक झाली आहे. शिवतीर्थावर या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल सव्वा दोन तास बैठक झाली आहे. यावेळी MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार हे गैरहजर होते. या बैठकीत टोलच्या संदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
TATA, Mahindra, Hyundai सोबतच 5 नवीन SUV लवकरच होणार लाँच
मुख्यमंत्र्यांनी दिलं आश्वासन
सार्वजनिक बांधकाम विभागाचे 29 आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे 15 असे 44 जुने टोलनाके बंद करण्यात यावेत अशी आमची मागणी होती यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका महिन्यात निर्णय घेतला जाणार असल्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे हे टोलनाके बंद होतील अशी आशा आहे, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
कॅमेरे लावणार आहेत
मुंबईच्या पाचही एन्ट्री पॉइंटवर येत्या 15 दिवसात सरकार CCTV कॅमेरे लावणार आहेत. त्याचा कंट्रोलरुम मंत्रालयात असेल. आमचेही CCTV कॅमेरे एन्ट्री पॉइंटवर असतील. या टोलनाक्यावरून किती गाड्यांची ये जा होते हे मोजले जाईल. टोल वाढणार, गाड्यांची संख्या वाढणार हे किती काळ सुरू राहणार आहे? असा सवाल करतानाच ही videography उद्यापासून सुरू करण्यात येणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे.
काल सह्याद्रीवर बैठक झाली. तिथे अनेक गोष्टी ठरल्या. पण ज्या लेखी स्वरुपात आलेल्या नव्हत्या. तिथे असं ठरलं की आज एक बैठक घेऊन लेखी स्वरुपात काही गोष्टी आणल्या जातील. नऊ वर्षानंतर मी टोलच्या विषयासाठी मी सह्याद्रीवर गेलो होतो. त्यावेळी म्हणजे नऊ वर्षापूर्वी पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी देखील काही गोष्टी ठरल्या होत्या. त्याचवेळी मला समजलं होतं टोलचे करार 2026ला संपतील. पण काही सुधारणा होणं गरजेचं आहे. त्यावेळी जे करार करण्यात आले त्यातही काही चुकीच्या गोष्टी होत्या. पण ते करार बँकेसोबत झाल्याने त्यात काही बदल करता येत नव्हते. पण त्यावेळी काही सुधारणा होणं आवश्यक होतं. त्या सुधारणा झाल्या नाहीत, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम