TATA, Mahindra, Hyundai सोबतच 5 नवीन SUV लवकरच होणार लाँच

0
1

सणासुदीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि यासोबत कार कंपन्यांनी नवीन लाँचसह त्यांच्या आगामी कारचे अनावरण करण्यास सुरुवात केलेली आहे. काल संध्याकाळी, टाटा मोटर्सने नवी हॅरियर आणि सफारीचे फेसलिफ्ट केलेले मॉडेल लाँच केले आहे. आता येत्या काही महिन्यांत अजुन नवीन कार लाँच होणार आहेत. यामध्ये Hyundai Creta Facelift, Mahindra Bolero Neo Plus, Mahindra XUV300 Facelift, Kia Sonet Facelift आणि Toyota Tazer यांसारख्या SUV चा समावेश आहेत.

Hyundai Creta Facelift

Hyundai Motor ची सर्वाधिक विक्री होणारी SUV Creta ची फेसलिफ्टेड आवृत्ती आगामी वर्षाच्या सुरुवातीला लाँच केली जाऊ शकते. Hyundai Creta Facelift मध्ये उत्तम लुक आणि डिझाइनसोबतच अनेक नवीन फीचर्स पाहायला मिळणार आहेत.

 

Tata Harrier Facelift

Tata Harrier फेसलिफ्ट यंदा दिवाळीपर्यंत लाँच होऊ शकते. टाटाच्या या पॉवरफूल मिडसाईज SUV च्या फेसलिफ्टेड मॉडेलच्या बाह्य आणि आतील भागात बरेच बदल दिसणार आहेत.

 

Tata Safari Facelift

Tata च्या सर्वात पॉवरफूल आणि महागड्या एसयूव्ही सफारीचे फेसलिफ्टेड मॉडेलही लाँच केले जाऊ शकते. जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवी सफारी खूप आकर्षक आणि पॉवरफूल असणार असल्याचे आता समजले जात आहे. याशिवाय, त्याचे इंटीरियर आणि फीचर्स देखील चांगली असणार आहेत.

Crime | वाढदिवसाच्या केकवरुन वाद; मित्रानेच मित्राचा केला घात

Kia Sonet Facelift

Kia Motorsची लोकप्रिय सब-कॉम्पॅक्ट 4 मीटर SUV Sonet देखील या वर्षाच्या अखेरीस चांगल्या ढंगात येऊ शकते. Sonet Facelift मध्ये बरेच कॉस्मेटिक बदल पाहिले जाऊ शकतात आणि ते CNG पर्यायामध्ये देखील उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Mahindra Bolero Nio Plus

बोलेरो निओचे आणखी एक मोठे आणि उत्तम मॉडेल महिंद्राच्या सर्वात स्वस्त 7 सीटर एसयूव्हीपैकी एक, बोलेरो निओ प्लस या वर्षी सणासुदीच्या हंगामात लॉन्च केले जाऊ शकणार आहे. बोलेरो निओ प्लस 7 आणि 9 सीटर पर्यायांसह ऑफर केले जाऊ शकते. त्यामध्ये अधिक चांगली फीचर्स पाहिली जाउ शकतात.

 

Mahindra XUV300 Facelift

अनेक लोक बऱ्याच काळापासून Mahindra XUV300 फेसलिफ्टची वाट पाहत आहेत. ही सब-4 मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही या वर्षी नोव्हेंबर/डिसेंबरमध्ये लाँच केली जाऊ शकते. सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत XUV300 फेसलिफ्टमध्ये वेगवेगळे कॉस्मेटिक बदल दिले जाऊ शकणार आहेत.

Toyota Urban Cruiser Taisor

टोयोटा इंडिया या वर्षी सणासुदीच्या हंगामात आपली पहिली मायक्रो SUV Taisor लाँच करू शकते.  जे मारुती सुझुकी फ्रंटचे री-बॅज केलेले मॉडेल असल्याचे सांगितल्या जात आहे. याआधी टोयोटाने मारुती सुझुकीची एर्टिगा, ग्रँड विटारा, बलेनो आणि ब्रेझा यांची री-बॅज असलेली मॉडेल्सही लाँच केलेली आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here