Nashik | एम. डी. (मेफेड्रॉन) ड्रग्ज तस्करितील मुख्य सूत्रधार ललित पाटील प्रकरणी उबाठा गटाच्या विश्वप्रवक्त्या सुषमाताई आंधरे यांनी नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या विरोधात केलेल्या व्यक्त्याच्या विरोधात आज शिवसेना आणि महिला आघाडी नाशिकच्या वतीने शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नाशिक शहर जिल्हा, मायको सर्कल येथे जोडे-मारो आंदोलन करण्यात आले आहे. उठाबा गटाच्या नेत्यांचे आणि ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या सोबतचे फोटोचा बॅनर करून सुषमाताई अंधारे यांना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी प्रतिप्रश्न विचारला. उबठा गटाचे नेते आणि ललित पाटील यांचे या नेत्यांबरोबर काही संबध आहेत का? याची आपण चौकशी करून उत्तर द्यावे आणि पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या विरुद्ध कोणताही पुरावा नसतांना कोणतेही बिनबुडाचे आरोप करू नये व नाशिकारांची माफी मागावी असं देखील. (Nashik)
Crime | वाढदिवसाच्या केकवरुन वाद; मित्रानेच मित्राचा केला घात
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महिला आघाडी सहसंपर्कप्रमुख सौ. सुवर्णाताई मटाले, सौ. अस्मिताताई देशमाने, युवासेना विस्तारक योगेश बेलदार, उपजिल्हाप्रमुख सुदाम डेमसे, महेश जोशी, शशिकांत कोठूळे, प्रमोद लासुरे, अमोल सूर्यवंशी, विधानसभा प्रमुख बाबुराव आढाव, रोशन शिंदे, प्रताप मेहरोलिया, दिपक मौले, नगरसेवक सूर्यकांत लवटे, उपमहानगर प्रमुख आनंद फरताळे, उमेश चव्हाण, अरुण घुगे, अमोल जोशी, युवासेना जिल्हाप्रमुख रुपेश पालकर, आबंदास जाधव, आदित्य बोरस्ते, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख किरण फडोळ, शुभम पाटील, भिवानंद काळे, युवराज मोरे, आकाश पवार, सागर बोरसे, कैलास जाधव, विलासराव गायकवाड, शिवा जोशी, तुषार गिरी, सौ. ज्योतीताई फड, सौ. अनिताताई पाटील, सौ. कीर्तीताई ठाकूर, सौ. सुलोचनाताई मोहिते, सौ. रंजनाताई सायखिंडीकर, सौ. गायत्रीताई खैरे, सौ. शितलताई माळी, सौ. कल्पना गावित, सौ. सविताताई गाडे, सौ. आशा रावूर, सौ. सुवर्णाताई पाटील, सौ. सिमाताई घाडे, सौ. भारती धात्रक, सौ. रजनी नावरे आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम