Budget Session 2024 | अर्थसंकल्पात तरुणांसाठी ‘या’ योजनांची घोषणा होणार..?

0
95
Ladki Bahin Yojna
Ladki Bahin Yojna

Budget Session 2024 |  आज राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून, आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आगामी काही महिन्यांत विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता असून, या पार्श्वभूमीवर विद्यमान सरकारच्या कार्यकाळातील हे शेवटचे अधिवेशन निर्णायक असणार आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी काय घोषणा होणार..? महाराष्ट्रातील जनतेला आश्वासनांचे कोणती खैरात मिळणार..? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.(Budget Session 2024)

Budget Session 2024 |  तरुणांसाठी भरीव तरतुदी..?

या लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात मोठा फटका बसला. त्यामुळे याची झळ आगामी विधानसभेतही बसू नये, यासाठी महायुतीच्या घटकपक्षांनी कंबर कसली असून, या पार्श्वभूमीवर राज्यातील तरुण, महिला, मुस्लीम समाज, दलित समाज यांसाठी काही भरीव तरतुदी करण्याची शक्यता आहे. केवळ राम मंदिर आणि धर्माच्या नावावर नाहीतर रोजगार आणि कामाच्या नावावर मतं मागा, असा नाराच तरुणांनी दिला होता. त्यामुळे आता तरुणांसाठीही सरकारने या अर्थसंकल्पात काही तरतुदी केल्याची माहिती समोर आली आहे.  (Budget Session 2024)

Budget Session 2024 | अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पात केल्या ‘या’ घोषणा

बेरोजगार तरुणांना मिळणार इतकी रक्कम..?

राज्य सरकारकडून या अर्थसंकल्पात तरुणांसाठीही मोठी तरतूद केल्याची माहिती आहे. राज्य सरकारकडून बेरोजगार तरुणांसाठी प्रतिमहिना ५ हजार रुपये इतका भत्ता बेरोजगार दिला जाण्याची शक्यता आहे. याबाबत आजच्या अर्थसंकल्पात घोषणा केली जाऊ शकते. (Budget Session 2024)

महिलांना मिळणार इतकी रक्कम..?

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने महिलांसाठी प्रतिवर्षी १ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचा काही ठिकाणी इंडिया आघाडीला फायदाही झाला. तर, मध्य प्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या कार्यकाळात तेथील महिलांसाठी लाडली बहन ही योजना सुरू केली होती. या अंतर्गत राज्यातील मध्यमवर्गीय महिलांना दर महिन्याला १२५० इतकी रक्कम दिली जाते. त्याच प्रकारची योजना महाराष्ट्रातही महायुती सरकार सुरू करण्याच्या तयारीत असून, या योजनेच्या अंतर्गत आर्थिक दुर्बल महिलांना प्रतिमाह १२०० ते १५०० रुपये देण्याची शक्यता आहे.(Budget Session 2024)

Budget Session | आजपासून विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; हे मुद्दे गाजणार


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here