Ladki Bahin Yojna | महाराष्ट्रातील महिलांना मिळणार प्रतिमाह १,५०० रुपये; तीन गॅस सिलिंडर मोफत 

0
61
Ladki Bahin Yojna
Ladki Bahin Yojna

Ladki Bahin Yojna |  लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने महिलांसाठी प्रतिवर्षी १ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचा काही ठिकाणी इंडिया आघाडीला फायदाही झाला. तर, मध्य प्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या कार्यकाळात तेथील महिलांसाठी लाडली बहन ही योजना सुरू केली होती. या अंतर्गत राज्यातील मध्यमवर्गीय महिलांना दर महिन्याला १२५० इतकी रक्कम दिली जाते. त्याच प्रकारची योजना महाराष्ट्रातही महायुती सरकार सुरू करण्याच्या तयारीत होते. यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून या योजनेचा अभ्यास सुरू होता. (Ladki Bahin Yojna)

Budget Session 2024 | अर्थसंकल्पात तरुणांसाठी ‘या’ योजनांची घोषणा होणार..?

Ladki Bahin Yojna | काय आहे योजना.?

दरम्यान, अखेर आजच्या या अर्थसंकल्पात अजित पवारांनी महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या अंतर्गत २१ ते ६० वर्षातील पात्र महिलांना १५०० रुपयांची आर्थिक मदत दर महिन्याला देण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून दरवर्षी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, जुलै २०२४ पासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. (Ladki Bahin Yojna)अजित पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणआर आहेत. या योजनेचा फायदा 52 लाख कुटुंबियांना होणार आहे.

Annpurna Yojna | वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत 

तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचीही आजची अर्थसंकल्पात घोषणा केली असून, या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. तसेच या योजनेचा फायदा राज्यातील ५२ लाख कुटुंबांना होणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here