Breaking News | आमदार रोहित पवारांनाही ईडीकडून समन्स

0
49
Breaking News
Breaking News

Breaking News | महाराष्ट्राच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना संकट वसूली संचलनालय म्हणजेच ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे.

दरम्यान, ईडीने रोहित पवार यांना त्यांच्या ‘बारामती अ‍ॅग्रो‘ या कंपनीच्या प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले आहे. आमदार रोहित पवार यांनी बुधवार रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहावे लागणार असल्याचे या समन्समध्ये म्हटले आहे. ईडीने गेल्या १५ दिवसांपूर्वीच आ. रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रोशी संबंधित काही ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर आता रोहित पवारांना ईडीने समन्स बजावलं आहे.(Breaking News)

Shivsena | आता उद्धव ठाकरेंची ‘मशाल’ ही जाणार..?

Breaking News | नेमकं प्रकरण काय..?

नव वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच आमदार रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो या कंपनीवर ईडी छापेमारी केली होती. बारामती अ‍ॅग्रोच्या तब्बल सहा ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली होती. कथित महाराष्ट्र शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी ही कारवाई झाली होती.

त्यावेळी रोहित पवार हे परदेशात असतानाच ईडीने ही छापेमारी केली होती. या छापेमारी बद्दल कळल्यानंतर रोहित पवार यांनी महापुरुषांचे फोटो पोस्ट ट्विट करत प्रतिक्रिया दिली होती. यात ते म्हणाले की,”हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा. ज्यांनी पिढ्यान् पिढ्या महाराष्ट्र धर्म जपला व वाढवला. अन्यायाच्या विरोधात संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनीच दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचा असा प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणूनच मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी तसेच टिकवण्यासाठी आता प्रत्येकालाच संघर्षाची तयारी ठेवावी लागेल, असं सूचक ट्विट रोहित पवारांनी केलं होतं.(Breaking News)

Shivsena | जे सुप्रीम कोर्टाला अमान्य ते सारे नार्वेकरांच्या कोर्टात मान्य

या महिन्यातील चौथी कारवाई 

१० जानेवारी रोजी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर त्याच दिवशी दुपारच्या सुमारास ठाणे जिल्ह्याचे खासदार राजन विचारे आणि काल ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घारी तसेच संबंधित ठिकाणी इडिने छापे टाकले होते. दरम्यान, या महिन्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांवर झालेली ही चौथी कारवाई आहे. मात्र, यामुळे आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. विरोधी पक्षांनी यावरून सत्ताधारी गटावर टिकास्त्र सोडले आहे. हे सराव सुड प्रवृत्तीने केले जात असल्याचे विरोधकांकडून बोलले जात आहे.

मात्र, आता यापुढे रोहित पवारांवर कोणती कारवाई होईल. रोहित पवारांचे सत्तेत विराजमान असलेले काका त्यांच्या पुतण्याच्या मदतीला धाऊन जातील का?. हे पहावे लागणार आहे.(Breaking News)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here