BJP Lok Sabha | काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर होते. अकोला आणि जळगाव येथे त्यांच्या हस्ते विकसकामांचे उद्घाटन झाले आणि त्यानंतर रात्री ते मुंबईत दाखल झाले असून, यावेळी महायुतीमधील जागावाटपाचा तिढा ते सोडवणार असल्याचे सांगितले जात होते. तर यानंतर राज्यातील ४८ पैकी ३२ जागा भाजप लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपने ३२ जागांचा हट्ट सोडला नसून, शिंदे गट आणि अजित पवार गटही काही जागांवर आग्रही आहे. तर, कालच्या बैठकीत भाजपचा काही जागांचा तिढा सुटला असून, या जागांवरील संभाव्य उमेदवारांची यादी अशी असू शकते. (BJP Lok Sabha)
BJP Lok Sabha | भाजपच्या संभाव्य उमेदवारांची यादी
- पुणे – मुरलीधर मोहोळ
- धुळे – विद्यमान खासदार सुभाष भामरे यांच्या ऐवजी प्रताप दिघावकर यांना उमेदवारी मिळू शकते.
- हिंगोली – या जागेसाठी भाजप आग्रही असून येथे तानाजी मुरकुटे यांना उमेदवारी मिळू शकते.
- जालना – रावसाहेब दानवे
- चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार
- नागपूर – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
- नंदूरबार – हिना गावित किंवा विजयकुमार गावीत.
- अकोला – संजय धोत्रे (BJP Lok Sabha)
Lok Sabha Elections Date | आगामी लोकसभा निवडणुकांबाबत मोठी घोषणा…
- ईशान्य मुंबई – मनोज कोटक
- सोलापूर – सिद्धेवर महाराज यांना उमेदवारी मिळू शकते.
- कोल्हापूर – ही जागा शिंदे गटाकडे असून, या जागेसाठी भाजप आग्रही आहे.
- भंडारा-गोंदिया – सुनिल मेंढे
- बीड – प्रितम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे
- माढा – रणजितसिंह निंबाळकर
- गडचिरोली – राष्ट्रवादीचे विद्यमान मंत्री धर्मरावबाबा अत्राम हे भाजपा चिन्हावर लढू शकतात.
- भिवंडी – कपिल पाटील
- सांगली – कॉंग्रेसचे विशाल पाटील भाजपा पक्षप्रवेश करू शकतात. त्यामुळे यांना उमेदवारी मिळू शकते.
- सातारा – उदयनराजे भोसले
- जळगाव – उन्मेष पाटील किंवा ए.टे पाटील.
- दिंडोरी – डॉ. भारती पवार
- रावेर – अमोल जावळे (BJP Lok Sabha)
Loksabha 2024 | अशी आहे महाविकास आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची यादी..?
- उस्मानाबाद – बसवराज पाटील
- उत्तर मुंबई – केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी मिळू शकते.
- छत्रपती संभाजीनगर – मंत्री अतुल सावे किंवा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांना उमेदवारी मिळू शकते.
- उत्तर मध्य मुंबई – आशिष शेलार
- ठाणे : डॉ. संजीव नाईक ही जागा शिंदे गटाकडे असून, या जागेसाठी भाजप आग्रही आहे.
- रत्नागिरी-सिंधुदुर्ग – नारायण राणे (या जागेचा तिढा कायम असून, या जागेसाठी शिंदे गट आग्रही आहे)
- दक्षिण मुंबई – राहूल नार्वेकर
- नांदेड – मिनल खतगावकर (अशोक चव्हाण यांची भाची)
- अहमदनगर – सुजय विखे पाटील किंवा राम शिंदे (तिढा कायम)
- अमरावती – नवनीत राणा यांचा भाजपा पक्ष प्रवेश होऊ शकतो. मात्र, या जागेवर आनंदराव अडसूळ हे देखील आग्रही आहेत. (BJP Lok Sabha)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम