PM Narendra Modi | उद्धव ठाकरे भाजपसोबत येणार?; बड्या नेत्याचा दुजोरा…

0
1
PM Narendra Modi
PM Narendra Modi

PM Narendra Modi | आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत येणार असल्याचा दावा शिंदे गटाच्या एका बड्या आमदाराने केला आहे. हा दावा शिंदे गटाचे सुप्रसिद्ध आमदार शहाजी बापु पाटील यांनी केला आहे. मात्र, त्यांच्या या दाव्याला अद्याप शिंदे गटाकडून किंवा भाजपकडून कुठलाही दुजोरा मिळालेला नाही. “काय झाडी, काय डोंगर” नंतर आता त्यांच्या या वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहेत. तर, यावेळी आपला अंदाज कधीही चुकणार नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला असून, यामुळे आता खरंच उद्धव ठाकरे हे भाजपसोबत जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (PM Narendra Modi)

BJP Lok Sabha | भाजपची रणनीती ठरली; कोणत्या जागेवर कोणता उमेदवार..?

PM Narendra Modi | …हे ज्याचे त्याने ठरवावे

यावेळी शहाजी बापु म्हणाले की,”एक हजार टक्के मोदी साहेब व उद्धव ठाकरे हे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकत्र येणार आहेत. आणि माझा अंदाज कधीही चुकत नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच निवडणूक ही तुमच्या पाच वर्षांच्या कामावर व कष्टावर चालत असते. तर, कोणत्याही निवडणुकीमध्ये शेवटचे दोन दिवस हे सर्वात महत्त्वाचे असतात. या शेवटच्या दोन दिवसांचा अंदाज हा या निवडणूकांचा सर्व्हे करणाऱ्यांनाही येत नसतो. नुकत्याच झालेल्या मध्यप्रदेश आणि राजस्थान विधानसभेचा निवडणूकीचा सर्वे देखील चुकला होता. त्यामुळे या सर्व्हेवर किती विश्वास ठेवायचा हे ज्याचे त्याने ठरवावे.(PM Narendra Modi)

Malegaon Leopard | मालेगावच्या लॉन्समध्ये बिबट्या; चिमुकल्याच्या हुशारीने मोठा अनर्थ टळला  

कार्यकर्त्यांचे सुगीचे दिवस

तर यावेळी पक्षांतरावर बोलताना शहाजी बापू म्हणाले की, “राजकारणात निवडणुका तोंडावर आल्या की पक्षाच्या कार्यकर्त्यांचे सुगीचे दिवस येत असतात. या सुगीच्या दिवसांमध्ये जशी पाखरे या रानातून त्या रानात हिंडत फिरत असतात. तसेच या पक्षातून त्या पक्षात कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकारी हे जातात. मात्र, ही लोक फक्त संधीच्या शोधात असतात. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आमच्या महायुती सरकारला लोकसभेत ४५ पेक्षा जास्त जागांवर निवडून येण्याचा दावा शहाजी बापू पाटील यांनी केला आहे.(PM Narendra Modi)

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर जनतेचा प्रचंड विश्वास असून, जनमताचा हा कौल ओळखूनच शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांनी नुकताच शिवसेने मध्ये पक्ष प्रवेश केला आहे. तर, येणाऱ्या काळात आपल्याला संपूर्ण तालुक्यात परिवर्तन झालेले पाहायला मिळेल, असा विश्वासही शहाजी बापू पाटील यांनी यावेळी बोलून दाखवला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here