Bhaskar Bhagare | ‘…कांद्याचा देव करून देवघरात ठेवा’; खा. भास्कर भगरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

0
27
Bhaskar Bhagare
Bhaskar Bhagare

Bhaskar Bhagare :  यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षांना मोठा धक्का बसला आणि यामागील अनेक कारणांपैकी कांदा निर्णय बंदी हेदेखील एक कारण आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते आणि याच कांद्यावर निर्यात बंदी लादल्यामुळे कांदा उत्पादकांच्या रोषाला महायुतीच्या उमेदवारांना सामोरे जावे लागले आणि कांदा फॅक्टरचा मोठा परिणाम हा दिंडोरी लोकसभेच्या मैदानात फाटला मिळाला. येथे भास्कर भगरे यांनी माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांचा दणदणीत पराभव केला आणि भाजपने बालेकिल्ला गमावला. या ऐतिहासिक विजयाचे गणित भास्कर भगरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मांडले आहे.

यावेळी दिंडोरी लोकसभेच्या निवडणुकीत (Dindori Lok Sabha Constituency) कांद्याचा (Onion) फार मोठा वाटा असून, या भागातील बहुतांश शेतकऱ्यांचे आर्थिक गणित हे कांदा पिकावरच अवलंबून आहे. कोरोना काळापासून शेतकऱ्यांची आर्थिक गणितं कोलमडली आणि त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसून आल्याचे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांनी सांगितले.

Bharati Pawar | पराभव पचवू न शकल्याने पवारांची मतदार व भगरे सरांवर टिका; शरद पवार गटाचा इशारा

Bhaskar Bhagare | कांदा उत्पादकांनी ६ उमेदवारांना घरी बसवले 

कांदा पट्ट्यात कांदा निर्यात, दुधाचे कोसळलेले भाव, शेतमालाला हमीभाव या कृषीसंबंधी मुद्यांचा फटका सत्ताधारी पक्षांतील उमेदवारांना बसला. त्यामुळे कांदा पट्ट्यात सत्ताधारी पक्षाच्या नाशिक, दिंडोरी, शिर्डी, नगर दक्षिण, सोलापूर, शिरूर येथील ६ उमेदवारांना शेतकऱ्यांनी घरी बसवले. (Bhaskar Bhagare)

…तर कांद्याचा देव करून देवघरात ठेवा

दरम्यान, खासदार भास्कर भगरे यांना या मुलाखतीत दिंडोरी लोकसभेत कांदा प्रश्नाचा फायदा झाला का..? याबाबत प्रश्न केला असता, ” या लोकसभा निवडणुकीत नक्कीच कांद्याचा मोठा वाटा आहे. निवडणुकीच्या पिंपळगाव बसवंत येथील सांगता सभेतही माजी आमदार अनिल कदम (anil kadam) हे मला म्हणाले होते की, सर तुम्ही निवडून आल्यानंतर पहिले कांद्याचा देव करून देवघरात ठेवा. कांदा हे पिक दिंडोरी लोकसभा मतदारसंघात फार मोठे आहे.

Deola | नवनिर्वाचित खासदार भगरेंकडून देवळ्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी; मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

कळवण, देवळा, निफाड, येवला, लासलगाव, नांदगाव, मालेगाव, चांदवड या तालुक्यांमध्ये कांद्याचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. येथील बहुतांश शेतकऱ्यांचे आर्थिक गणित हे उन्हाळ कांदा किंवा लाल कांद्यावरच अवलंबून असते. त्यांचे आर्थिक गणित हे कोरोना काळापासून अत्यंत डळमळीत झाले असून, त्याचा परिणाम हा या लोकसभा निवडणुकीत दिसून आला. तसेच दिंडोरी मतदारसंघात रेल्वेचा प्रश्न, तरुणांचे व महिलांचे प्रश्न, आरोग्य हे महत्त्वाचे प्रश्न आहेच मात्र कांद्याचा प्रश्न हा येथील सर्वात मोठा प्रश्न असल्याचेही यावेळी कसदार भागरे यांनी सांगितले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here