सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील जनता गरीब असली तरी अत्यंत सुज्ञ असुन त्यांनी लोकसभेत भास्कर भगरेसरांना लोकसभेत पाठविण्याचा निर्णय योग्य असुन पराभव पचवू न शकल्याने पराभूत उमेदवाराने मतदार व भगरे सरांवर टिका सुरु केल्याचे निफाड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दिलीपराव मोरे यांनी म्हणाले.
दिंडोरी लोकसभा निवडणूकीत आपण पराभूत का झालो..? याचे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाच्या माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी आत्मपरीक्षण करण्याचे सोडुन त्या मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांना दोष देत आहेत. हा मतदारांचा अपमान असल्याचे दिलीपराव मोरे म्हणाले. तसेच भास्कर भगरे हे सर्वसामान्य शिक्षक कार्यकर्ते असुन शरद पवार यांच्यावर निष्ठा असणारे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यांनी शपथ घेताच पराभूत भारती पवार यांनी त्यांच्यावर वैयक्तिक टिका करणे सुरु केले आहे.
Bharti Pawar | खर्चात भारती पवारांचीच आघाडी; निवडणुकीवर आतापर्यंत इतका खर्च..?
केंद्रीय मंत्री असणाऱ्या भारतीय पवार ह्या अद्यापही सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडुन झालेला दारूण पराभव पचवू शकलेल्या नसल्याचे मोरे म्हणाले. तर, भास्कर भगरे हे सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करत असुन त्यांच्यावर केलेली वैयक्तिक टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहन करणार नाही. आणि जर त्यांनी यापुढे टिका टिप्पणी केल्यास पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा ईशाराही यावेळी निफाड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दिलीपराव मोरे यांनी दिला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम