रोशन गांगुर्डे – प्रतिनिधी : चांदवड | प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसाच्या निमित्त नाशिक जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने (दि. ५) जुलै रोजी रक्तदान घेण्यात आले. त्यास नाशिक जिल्हा तसेच चांदवड तालुक्यातील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. प्रहार संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष तसेच चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश निंबाळकर यांनी नागरिकांना रक्तदान करण्याचे आव्हाहन केले होते. त्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले, रक्तदान हे सर्वोत्कृतष्ठ दान समजले जाते. बचू कडू यांनी देखील आत्तापर्यंत 124 वेळा रक्तदान केले आहे. त्यामुळे बच्चू कडू यांचा वाढदिवस रक्तदान करून साजरा करण्याचा सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता.
त्यात अंदाजे 400+ प्लाझा रक्त रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी समाज प्रभोधनकार सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता. त्यांनी आपल्या कीर्तनातून बच्चू कडू यांचे कार्य तसेच गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. गणेश निंबाळकर यांना विधानसभामध्ये पाठविण्याचेही त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाच्या आयोजकांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.
Ganesh Nimbalkar | चांदवड-देवळ्याच्या मतदारांची पसंती यंदा ‘शेतकरी नेत्याला’..?
यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर जिल्हा उपाध्यक्ष राम बोरसे, सरचिटणीस समाधान बागल,तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण. युवा तालुकाध्यक्ष चंद्रकांत जाधव, गणेश पाचोरकर, कार्याध्यक्ष गणेश तिडके, पिंटू तिडके, उपतालुका अध्यक्ष संदीप महाराज जाधव, विनोद महाराज जाधव, प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्कप्रमुख हरिभाऊ सोनवणे व नामदेव पवार, सुरेश उशीर, नवनाथ पगार, जितु जाधव, रेवन गांगुर्डे व सर्व प्रहार पदाधिकारी तसेच सर्वच कार्यकर्ते उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम