Akola Harassment Case | राज्यात विकृतांचा कल्लोळ ! अश्लील व्हिडिओ दाखवत शाळेच्या शिक्षकाकडूनच…

0
94

Akola Harassment Case : कोलकत्यातील घटनेने संपूर्ण देशाला सुन्न केलं. त्यातून देश सावरेल इतक्यातच बदलापूर मधील घटनेनं राजासह देशाला पुन्हा एकदा हादरवलं. इतकच काय तर राज्याच्या इतर भागातून महिलांवरील अत्याचाराच्या घटना वारंवार बाहेर येत असल्यामुळे महाराष्ट्र मुलींकरिता सुरक्षित आहे की नाही हा प्रश्न पडतो. महाराष्ट्राची ओळख कायदा व सुव्यवस्था राखणारं राज्य म्हणून म्हणून केली जाते. परंतु याच महाराष्ट्रात आता मुलींकरिता शाळा कितपत सुरक्षित आहे असे सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. बदलापुरातील घटनेमुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असतानाच आता अकोल्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाचा काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. अशा विकृती समाजात मनमोकळेपणे वावरत आहेत. त्यांवरती कठोर कारवाई केली जाणार आहे की नाही. अजून किती मुलींनी या विकृतींना बळी पडायचे आहे? असे संताप्तजन्य सवाल नागरिकांच्या मनात उपस्थित होऊ लागले आहेत.

बदलापुरातील मन हेलावून टाकणारी घटना ताजी असतानाच अकोल्यात गुरु शिष्याच्या नात्याला गालबोट लावणारी संतापजनक घटना समोर आली आहे. अकोल्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षकाकडून अश्लील व्हिडिओ दाखवत सहा विद्यार्थिनींचा विनयभंग करण्यात आल्याची घटना आता समोर आली आहे. ज्या ज्ञानमंदिरात शिक्षण घेण्यासाठी जातो तेच न्यानमंदिर आता मुलींसाठी सुरक्षित नसल्याची गोष्ट ह्या प्रकरणावरून स्पष्ट होत आहे. शिक्षकाकडून केले गेलेले हे कृत्य निकृष्ट दर्जाचे असून संपूर्ण अकोल्यामध्ये या घटनेमुळे खळबळ माजली आहे. महिलांवर शाळा, इस्पितळ, महाविद्यालयांमध्येच अत्याचार होत असतील तर महिला नेमक्या सुरक्षित कोणत्या ठिकाणी आहेत? हा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होतोय.

Badlapur Case Updates | 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंद! महाविकास आघाडीची मोठी घोषणा

नेमकं घडलं काय? 

अकोल्यात, बाळापुर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाकडून 6 विद्यार्थिनींवर अत्याचार झाला असल्याची घटना समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक विभागात सदर प्रकार घडला. अश्लील व्हिडिओ दाखवत विद्यार्थिनींचा शिक्षकाकडून छळ करण्यात आला. हा सर्व प्रकार 20 ऑगस्टच्या संध्याकाळी उघडकीस आला. त्यानंतर आरोपी शिक्षकावरती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी संबंधित प्रकरणावर प्रतिक्रिया देत दोषीवरती कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.

Nashik Crime | नाशकात चिमुकलीला ओरबाडले; बदलापूरनंतर नाशिकमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्याकडून शाळेला भेट

“आरोपी शिक्षकाला सेवेतून बडतर्फ करून सदर प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात गेलं पाहिजे व अंडरटेकिंग मध्ये राहिलं पाहिजे” अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी सरकारला केली आहे. नितीन देशमुख हे बाळापुर मतदार संघातील ठाकरे गटाचे आमदार असून त्यांनी शाळेला भेट देऊन माध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी “महिलांना दीड हजार देण्यापेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये, सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावे” असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. “महिलांसाठी आवाज उठवणाऱ्या आंदोलनाला राजकीय ही असलेलं आंदोलन म्हणणारे मुख्यमंत्री मी आजवर पाहिले नाहीत.” असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंवरती टोला लगावला.

अंबादास दानवेंकडून गृहमंत्र्यांच्या राजीनामाची मागणी

अंबादास दानवे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजीनामाची मागणी करत, “या राज्यामध्ये कायद्याचा धाक उरला नसून लाडक्या बहिणीच्या लेकींनी किती छळ सहन करायचा? बदलापूर पाठोपाठ अकोल्यात झालेली ही घटना संतापजनक आहे. सरकारने फडतुसगिरी बंद करत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.” अशी मागणी केली.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here