सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | गुंजाळनगर (ता.देवळा) येथील प्रगतीशील शेतकरी देवाजी पुंजाराम गुंजाळ (वय ८२) यांचे नुकतेच निधन झाले असून, कुटुंबातील सदस्यांनी त्यांची रक्षा पाण्यात विसर्जित न करता घरालगत असलेल्या शेतातील खड्ड्यात विसर्जित करून त्यात वृक्षारोपण केले. कै. देवाजी गुंजाळ यांचा बुधवारी (दि.२१) रोजी रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम होता. बहुतांश ठिकाणी मृत व्यक्तीच्या रक्षा या नदीच्या वाहत्या पाण्यात सोडतात. यामुळे पाणी प्रदूषित होते.
Deola | देवळा तालुक्यात रिक्त अंगणवाडी मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया
गुंजाळ कुटुंबियांनी त्यांच्या अंत्यविधी नंतर जमा केलेली रक्षा पाण्यात न टाकता आपल्या शेतात खड्डे खोदून त्यात टाकून वृक्षारोपण केले. या ठिकाणी लावलेल्या रोपांचे ते वडिलांच्या आठवणी प्रीत्यर्थ संवर्धन करणार असल्याचे सांगत पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचा संदेश या माध्यमातून उपस्थित नातेवाईकांना त्यांनी दिला.
यावेळी कुटुंबातील सदस्य बाळासाहेब गुंजाळ, संजय गुंजाळ, बापू गुंजाळ, प्रवीण गुंजाळ आदींसह मुली, सुना, नातवंडे तसेच नातेवाईक मंडळी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम