Ajit Pawar NCP Crisis | महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या वर्षभरापासून अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात कधी काय होईल. हे काही सांगता येत नाही. एका मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला होता की, देवेंद्र फडणवीस हे राजकीय खलबतांसाठी रात्रीच्या वेळी हुडी आणि टोपी घालून वेश बदलून जायचे. यानंतर आता राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राष्ट्रवादीतील फुटीच्या आधी वेषांतर करून दिल्लीला अमित शाह यांच्या भेटीला जात असल्याचे सांगितले.
अजित पवार दिल्लीला वेश बदलून जायचे
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी फूट पडली आणि शिवसेनेनंतर राज्याच्या राजकारणात दूसरा मोठा राजकीय भूकंप झाला. पण राष्ट्रवादीत या फुट पडली याची रणनीती नेमकी कशी ठरली? याबाबत माध्यमांना कसं कळलं नाही? याबाबत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये स्वतः अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे. (Ajit Pawar NCP Crisis)
Ajit Pawar Birthday | वाढदिवशी दादांसाठी वहीनींचे ‘खास’ गिफ्ट; गुलाबी जॅकेट घालून दादा नगरला
Ajit Pawar NCP Crisis | वेगळे होण्यापूर्वी दिल्लीत दहा बैठका
आम्ही वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत होतो. त्यावेळी मास्क आणि टोपी घालून वेश बदलून दिल्लीला जात असल्याचा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला असून, असे दहा वेळा दिल्लीत बैठका झाल्याची कबुली त्यांनी दिली. दिल्लीत पत्रकारांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनौपचारिक गप्पा मारत असताना त्यांनी हा खुलासा केला आहे. तर, महायुतीतील सहभागापूर्वी आपल्या अमित शाह यांच्यासोबत तब्बल दहा वेळा बैठका झाल्या आणि या बैठकांसाठी दिल्लीला जाताना आपण वेश बदलून जात असल्याचेही अजित पवार म्हणाले.
Ajit Pawar | आता दादा फक्त गुलाबी जॅकेटच घालणार..?; दादांना अचानक गुलाबी रंग का प्रिय झाला
आज राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडल्यानंतर तब्बल 40 आमदार हे अजित पवारांसोबत असल्याचा दावा अजित पवार गटांकडून केला जात आहे. दरम्यान, फुट पडल्यानंतर पक्षाचे नाव आणि घडयाळ चिन्ह हे निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला बहाल केले. तर, आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांच्या आमदारांना पात्र ठरवत निकाल दिला. यानंतर शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचाही आमदार अपात्रतेचा खटला हा सुप्रीम कोर्टात सुरू असून, आज या प्रकरणी सुनावणी पार पडणार आहे. (Ajit Pawar NCP Crisis)
सर्वोच्च न्यायालयात 23 जुलैला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर सुनावणी होणार होती. मात्र, नीट आणि यूजी परीक्षा प्रकरणाची सुनावणी दिवसभर सुरु राहिल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी ही 29 जुलै रोजी तर ठाकरे गटाच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी ही 30 जुलै रोजी होणार आहे.
NCP Ajit Pawar | अजित पवारांचा मोर्चा मुस्लीम मतांकडे; मुस्लीम आरक्षणाची शिफारस करणार..?
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम