मुंबई: आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 65 वा वाढदिवस आहे. काल ते पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणलेल्या केकची दिवसभर चर्चा होती. तर, आज अजित पवारांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या भेटवस्तूची चर्चा आहे. स्वतः अजित पवारांनी ट्विट करत सुनेत्रा पवारांनी दिलेल्या भेटीबद्दल सांगितले आहे.
Ajit Pawar Birthday | सुनेत्रा पवारांचे खास ‘गिफ्ट’
वाढदिवसाच्या निमित्ताने आज सकाळपासूनच अजित पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, राज्यभरात जोरदार बॅनरबाजीही कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. तर, सकाळीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही त्यांना फोनवरून शुभेच्छा दिल्याचे समजते. दरम्यान, आज अजित पवार हे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यासाठी सकाळीच ते नगरच्या दिशेने रवाना झाले. यावेळी निघण्यापूर्वी अजित पवार यांच्या पत्नी व राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी अजितदादांना पांढऱ्या रंगाचे गुलाबाचे फुल देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि आपल्या गुलाबी जॅकेटवर हे फूल लावून अजित पवार नगर दौऱ्यावर निघाले आहेत. (Ajit Pawar Birthday)
Ajit Pawar | आता दादा फक्त गुलाबी जॅकेटच घालणार..?; दादांना अचानक गुलाबी रंग का प्रिय झाला
अजित पवारांनी ट्विट करत दिली माहिती
याबाबत स्वतः अजित पवार यांनी ट्विट करुन सांगितल्याने पहिल्यांदाच अजित पवारांचा हा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. “मी राज्याचा गाडा हाकत असताना आयुष्यभर नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणाऱ्या माझ्या अर्धांगिनीने आज मला गुलाबाचे फूल देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या”, असे ट्विट अजित पवारांनी केले आहे. त्यामुळे पाहिल्यांदाच अजित पवार हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत व्यक्त होताना दिसले. तसेच यामुळे आज पहिल्यांदाच अजित पवार व सुनेत्रा पवार यांची केमेस्ट्री पहायला मिळाली. तर, एरवी रोखठोक, मिश्किल आणि धडाकेबाज वक्तव्य करणाऱ्या अजितदादांचा वेगळा अंदाज समोर असून, अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Ajit Pawar Birthday)
NCP Ajit Pawar | अजित पवारांचा मोर्चा मुस्लीम मतांकडे; मुस्लीम आरक्षणाची शिफारस करणार..?
गुलाबी कोटवर पांढरे फूल लाऊन दादा दौऱ्यावर
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रसिद्धीचे काम पाहणाऱ्या कंपनीने महिला मतदारांना केंद्रस्थानी ठेऊन एक रणनीती निश्चित केली असून, यानुसार पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात गुलाबी रंगाचा वापर वाढवण्यात आला आहे. याचमुळे आता बॅनर, पोस्ट, स्टेज एवढंच नाहीतर स्वतः अजितदादाही गुलाबी रंगाच्या कोटमध्ये दिसत असून, राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांमध्ये गुलाबी रंग चर्चेचा विषय ठरत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम