नाशिक | आईराजा उधं उधं…सप्तशृंग गडावर भव्य मिरवणूक

0
3

नाशिक: महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धशक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सप्तशृंगी देवी मंदिरामध्ये आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. आज पहाटे देवीच्या दागिन्यांची मिरवणूक उत्साहात पार पडली. याबरोबरच मंदिरात षोडशोपचार पूजा करून घटस्थापना देखील करण्यात आली. यावेळी हजारो भाविकांनी या उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात गडावर हजेरी लावली होती.

सकाळी सात वाजेच्या सुमारास देवीच्या आभूषणांची विधिवत पूजा करून ट्रस्टच्या मुख्य कार्यालय ते मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर आभूषणे मंदिरात नेऊन नाशिकचे मुख्य जिल्हा व सत्रन्यायाधीश तथा संस्थानचे विश्वस्त बी. व्ही. वाघ यांच्या हस्ते षोडशोपचार पूजा करण्यात आली. यानंतर घटस्थापना जगमलानी यांचे हस्ते करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप हेदेखील याठिकाणी उपस्थित होते.

शारदीय नवरात्रोत्सव मुहूर्तावर पावसाची हजेरी; महाराष्ट्रासह देशाच्या ‘या’ भागांत पावसाची शक्यता

महाराष्ट्रातील आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर १५ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबरदरम्यान मोठ्या उत्साहात शारदीय नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. दर्शनासाठी  एक दिवस आधीपासूनच गडावर भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. घटस्थापनेसाठी लागणारी ज्योत हजारो मित्र मंडळांकडून गडावरून गावोगावी नेली जात आहे.

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी सात वाजता ट्रस्टच्या मुख्य कार्यालय ते मंदिरापर्यंत देवीच्या सुवर्ण अलंकारांची व आभूषणांची मिरवणूक काढण्यात आली. यानंतर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. नवरात्रोत्सवादरम्यान मंदिर २४ तास खुले ठेवण्यात आले आहे. तसेच रोज पहाटे काकडआरती, सकाळी पंचामृत महापूजा, दुपारी महाआरती व सायंकाळी सांजआरती अशा तिन्ही वेळी आरती होणार असल्याची माहिती सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.

 गडावर खासगी वाहनांना प्रवेशबंदी

श्री क्षेत्र सप्तश्रृंगी गडावर आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होत असून, या कालावधीत सप्तश्रृंगी गडावर लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. गडावरील रस्ता घाटातील असून तो वळणाचा आणि अरुंद असल्यामुळे वाहतुक कोंडी होत असते. त्यामुळे आपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. वाहनांची कोंडी होऊ नये, म्हणून आजपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत सर्व प्रकारच्या खासगी चारचाकी व दुचाकी वाहनांना  प्रवेश बंदी करण्यात आली आहे.(नाशिक)

Bus accident: समृध्दी महामार्गावरील अपघातात नाशिकचे 15 जण जागीच ठार


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here