Deola | देवळा ॲग्रो प्रोड्युसर कंपनी मार्फत नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेंतर्गत आरोग्य कार्डची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली असून याचा देवळा शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक जितेंद्र आहेर यांनी केलेले आहे. भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर यांच्या संकल्पनेतून देवळा येथे देवळा ॲग्रो ई-सर्व्हिसेसच्या माध्यमातून रविवारी (दि. १५) रोजी मोफत आभा कार्ड शिबीर घेण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन नगरसेवक जितेंद्र आहेर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या सुविधा केंद्रात देवळा शहर आणि तालुक्यातील नागरिकांसाठी भारत सरकारचे मोफत आभा (हेल्थ) कार्ड काढून मिळणार आहे. तसेच सर्व ऑनलाईन सुविधा माफक दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. (Deola)
नाशिक | आईराजा उधं उधं…सप्तशृंग गडावर भव्य मिरवणूक
मोफत आभा कार्ड साठी नागरिकांनी, आधार कार्ड, आधार लिंक असलेला मोबाईल नंबर आणि व्यक्ती स्वतःहजर राहणे आवश्यक आहे. मोफत आभा कार्ड सुविधेमुळे नागरिकांची होणारी फरफट, पैशांची बचत होणार असल्याने या सुविधेचे नागरिकांनी समाधान व्यक्त केलेले आहे. यावेळी उपनगराध्यक्ष अशोक आहेर, बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पगार, माजी उप नगराध्यक्ष अतुल पवार, नगरसेवक हितेश आहेर, नानू आहेर, कैलास पवार आदींसह कारभारी जाधव, हर्षद भामरे, जगन आहेर, संजय चंदन आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम