शारदीय नवरात्रोत्सव | आज शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत असून या मुहूर्तावर राज्यासह देशभरात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. आज आणि उद्या राज्यासह देशात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. पुढील 48 महाराष्ट्रात काही जिल्ह्यात ढगांच्या कडकडाटासह पावसाची शक्यात हवामान खात्याने वर्तवलेली आहे. दिल्लीसह उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही पावसाची शक्यता आहे. देशासह राज्यातील अनेक भागातून मान्सूनने माघार घेतली असल्याने तापमानात वाढ झालेली आहे. परंतु या पावसामुळे देशभरातील काही भागांना दिलासा मिळणार आहे. (शारदीय नवरात्रोत्सव)
मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली असताना देशाच्या अनेक भागात अजूनही पाऊस बरसताना पाहायला मिळतो आहे. याबरोबरच काही भागांत तापमान वाढीमुळे अनेक ठिकाणी उन्हाची झळ जाणवताना दिसत आहे. सध्या दिल्लीत हवामान बदलत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत दिल्लीमध्ये पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामुळे देशातील तापमानात घट होण्याचाही अंदाज आहे.
Bus accident: समृध्दी महामार्गावरील अपघातात नाशिकचे 15 जण जागीच ठार
उत्तर प्रदेशमध्येदेखील थंडीची चाहून लागल्याचं चित्र दिसून येत आहे. गुजरात, राजस्थानबरोबरच उत्तर प्रदेशातून मान्सूनने पूर्णपणे माघार घेतलेली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशामध्ये 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत मेघगर्जनेसह अतिवृष्टीचीही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हिमाचल प्रदेशासह, उत्तराखंडमध्येही पहाटे गुलाबी थंडी पडताना दिसत आहे. आज आणि उद्या हिमाचल प्रदेशातील कुल्लू, मंढी आणि शिमला भागात पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.
पुढील 48 तासांत महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज
राज्यातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली असली तरी पावसाने पूर्णपणे माघार घेतलेली नाही. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टी निर्माण झाल्याने देशासह राज्यात काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. राज्यात पुढील 48 तासांत कोकणासह काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. रविवारी म्हणजे आज कोकण किनारपट्टी भागांत काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी ढगांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. याशिवाय पुढील 48 तासांत उत्तर राज्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम