Abhishek Ghosalkar | राज्याचे राजकारण हे सध्या अदि खालच्या थरावर गेले असून, आता टिका अस्त्र नाहीतर, थेट अस्तरांनी वार केले जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. आधी कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महानगर प्रमुख महेश गायकवाडवर पोलिस ठाण्यात गोळ्या झाडल्या. त्यानंतर चाळीसगाव येथे एका माजी नगरसेवकावर गोळीबार झाला आणि आता ठाकरे गटाचे मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र तथा माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबूक लाईव्ह सुरू असतानाच गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. पैशांच्या वादातून त्यांच्यावर हा गोळीबार झाला आहे. ही घटना दहीसरमध्ये आज संध्याकाळी साडे आठच्या सुमारास घडली आहे. (Abhishek Ghosalkar)
या घटनेतील आरोपीचे नाव हे माॅरिस नोरोन्हा असं असून, त्याने अभिषेक घोसाळकर यांच्यावर तब्बल पाच राऊंड फायर केले आणि यानंतर त्याने स्वत:वरही डोक्यात गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली आहे. यानंतर अभिषेक घोसाळकर यांना तातडीने करुणा रुग्णालय दाखल करण्यात आले होते. पाच पैकी तीन गोळ्या त्यांना लागल्याने रुग्णालयातच उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. काही आर्थिक वादांमधून हा हत्येचा थरार झाल्याची माहिती उघडकीस आली आहे.
Kalyan | भाजप आमदाराने पोलिस ठाण्यातच शिंदेंच्या नगरसेवकावर झाडल्या गोळ्या
Abhishek Ghosalkar | नेमकं प्रकरण काय..?
अधिक माहितीनुसार, मृत आरोपी माॅरिस व माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर या दोघांनी सोबत फेसबुक लाईव्ह केले. हे फेसबूक या लाईव्ह झाल्यानंतर आभार मानत खूर्चीवरून उठत असतानाच मारेकरी माॅरिस नोरोन्हा याने अभिषेक घोसाळकर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. दरम्यान, हा सर्व थरार फेसबुक लाईव्हमध्ये रेकॉर्ड झाला असून, हा गोळीबार झाल्यानंतर अभिषेक घोसाळकर यांनी स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, माॅरिस नोरोन्हाने एकापाठोपाठ सलग पाच राऊंड फायर केल्याने ते गंभीर जखमी झाले होते. फेसबुक लाईव्हमधील अभिषेक घोसाळकर यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहता त्या दोघांत कोणतीही तणावाची परिस्थिती असल्याचे दिसून येत नाही. मात्र, मृत आरोपी माॅरिस नोरोन्हा याने अभिषेक घोसाळकर यांना संपवण्याचा हा कट थंड डोक्याने रचल्याचे स्पष्ट होत आहे.(Abhishek Ghosalkar)
Nashik Crime | खर्चायला पैसे देत नाही; पत्नीने रचला पतीच्या खुनाचा ‘मास्टर प्लॅन’
कोण आहे आरोपी माॅरिस नोरोन्हा?
समोर आलेल्या माहितीनुसार, मृत आरोपी माॅरिस नोरोन्हा हा दहीसर परिसरात नावाजलेला होता. तसेच तो स्वत:ला स्वयंघोषित नेता समजत असल्याची माहिती समोर आली आहे. अभिषेक घोसाळकर व माॅरिस नोरोन्हा यांच्यात तब्बल एक वर्षांपूर्वी अगदी टोकाचा वाद झाला होता.पण काही दिवसानंतर या दोघांची पुन्हा मैत्री झाली. दरम्यान, हीच मैत्री आता दोघांच्या जीवावर बेतली आहे. या दोघांमध्ये पैशांवरून काही वाद असल्याचीही माहिती समोर आलीअसून, माॅरिस नोरोन्हा याने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर त्याने स्वत:वरही तब्बल तीन ते चार गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली आहे.(Abhishek Ghosalkar)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम