Nashik Crime | नाशिकमधील गुन्हेगारी ही दिवसेंदिवस वाढतअसून, सध्या क्षुल्लक कारणांवरून थेट हत्या करण्याचे प्रकार वाढले आहे. या आठवड्यातच एका नंदुरबारच्या मुलीची तिच्या प्रियकराने क्षुल्लक संशयाच्या कारणावरून हत्या केली होती आणि आता ही या आठवड्यातील दुसरी खुनाच्या प्रयत्नाची घटना असून, यात सुदैवाने पती बचावला आहे. मात्र, त्यामुळे आता शहरात पोलिसांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात होत आहेत.
या घटनेत “खर्चण्यासाठी पैसे देत नसल्याच्या क्षुल्लक कारणावरून आपल्या पतीच्या हत्येचा कट रचल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. पत्नीने आपल्या साथीदारामार्फत पतीला थेट सर्पदंश घडवून आणत संपवण्याचा प्लॅन बनवला होता. ही घटना नाशिकमधील बोरगडच्या उज्ज्वल नगर येथे घडली असून, पत्नीने रचलेल्या या हत्येच्या ‘मास्टर प्लॅन’ मधून वाचलेल्या पतीच्या तक्रारीवरून त्याची आरोपी पत्नी आणि साथीदाराच्या विरोधात म्हसरूळ पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.(Nashik Crime)
Nashik | नाशिकमध्ये ‘ईडीअस्त्र’ बरसले; मोठे व्यावसायिक रडारवर
Nashik Crime | नेमकं प्रकरण काय..?
Nashik Crime | बेरोजगार मित्रावर विश्वास ठेवणे नाशिकच्या तरुणीला ४० लाखांत पडले
पत्नीला ‘लक्जरियस लाइफस्टाइल’ची हौस
विशालची पत्नी एकता हिला ‘लक्जरियस लाइफस्टाइल’ मध्ये राहण्याची सवय होती. त्यासाठी ती पतीकडे सारखी पैशांची मागणी करायची. मात्र, आपली आर्थिक परिस्थिती साधारण असल्याने आवाक्यात खर्च कराण्यास पती विशाल हा तिला सांगत असे. दरम्यान, याच कारणावरून दोघांमध्ये वाद व्हायचे. नंतर हे वाद वाढत असल्याने काही महिन्यांपूर्वी पत्नी एकता ही घर सोडून लातूरमध्ये मैत्रिणीकडे निघून गेली होती. यानंतर पती विशाल याने तिची समजूत काढली व तिला पुन्हा घरी आणले. यानंतर तब्बल पाच-सहा महिने सर्व व्यवस्थित सुरू होते. मात्र, आता अचानक पत्नी आणि तिच्या साथीदाराकडून विशालला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पोलिसांनाही खोटे सांगितले
पती विशाल हा घरातून बाहेर गेल्यानंतर पत्नी एकता ही म्हसरूळ पोलिस ठाण्यात गेली. तेथे तिने पोलिसांसमोरही बनाव केला. “आमच्या घरात कोणीतरी हल्ला केला आहे’, असे तिने पोलिसांना सांगितले. दरम्यान, पोलिसांना तिच्यावर संशय आल्याने त्यांनी गुन्हा नोंदवला नाही. तेवढ्यातच जिल्हा रुग्णालयातून एका व्यक्तीला बळजबरीने सर्पदंश करत मारण्याचा प्रयत्न केल्याचा फोन आला. पोलिस तातडीने रुग्णालयात गेले आणि तीच संधी साधून पत्नी एकता ही फरार झाली. (Nashik Crime)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम