Astro Tips | तुमच्या खिशातल्या रूमालासोबत जोडलंय तुमचं नशीब; वाचा सविस्तर

0
59
Astro Tips
Astro Tips

Astro Tips |  ज्योतिष शास्त्रानुसार, आपल्या दैनंदिन वापरात असणाऱ्या अनेक गोष्टींचे थेट संबंध हे आपल्या नाशिबासोबत असतात. अशाच एक रोजच्या वापरातील वस्तूचे धागे हे आपल्यासोबत जोडलेले असून, ते कोणत्या रंगाचे असावे आणि त्या वस्तूचा व आपल्या नाशिबाचा काय संबंध हे आपण जाणून घेणार आहोत…

अनेक जणांना आपल्यासोबत रुमाल बाळगण्याची सवय असते. तर, नेहमी सोबत असणारा हा रुमाल तुमच्यावर चांगला किंवा वाईट प्रभाव टाकत असतो. मात्र, जर तुम्ही रुमालाशी संबंधित असणाऱ्या काही गोष्टी पाळल्या नाही तर त्या तुमच्यासाठी नुकसानकारक ठरु शकतात. रुमाल  घेताना आपण कधीच विचार करत नाही किंवा केलाच तर फार तर रंग आणि कपडा हे बघूनच आपण रुमाल घेतो. पण तुमच्या खिशात असणाऱ्या रुमालाचे धागे हे थेट तुमच्या नशीबासोबत जोडले गेले आहेत, हे ऐकून तुम्हाला नवल वाटेल. मात्र, आता रुमाल घेताना पुढील गोष्टी लक्षात घेऊनच खरेदी करा. (Astro Tips)

तर, ज्योतिष शास्त्रानुसार काही राशींसाठी काही विशेष रंग हे चांगले परिमाण देतात. तर काही राशींसाठी ते वर्ज्य मानले जातात. ज्या प्रकारे रंग महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे आपल्या रोजच्या वापरातील असणाऱ्या रुमालालाही ज्योतिष शास्त्रात महत्त्व आहे. अगदी लहानपणापासून आपण हातात बाळगत असलेला हा रुमाल आपल्यावर प्रभाव टाकत असतो. त्यामुळे आता रुमालामुळे आपलं नशीब उजळवण्यास मदत होणार आहे. मात्र, त्यासाठी तुम्हाला रुमाल वापरताना कोणत्या रंगाचा रुमाल वापरावा याची काळजी घ्यायची आहे. तर, जाणून घेऊयात की कोणत्या रंगाचा रुमाल हा कोणत्या राशीसाठी खास आहे…

Astro Tips | मेष राशी 

मेष राशीचा स्वामी हा मंगळ आहे. त्यामुळे मेष राशीच्या लोकांसाठी लाल, पिवळा व गुलाबी हे रंग शुभ मानले जातात. त्यामुळे तुम्ही या रंगाचा रुमाल वापरल्यास तुमचे नशीब उजळण्यास मदत होईल.

वृषभ राशी 

वृषभ राशीचा स्वामी हा शुक्र आहे. त्यानुसार, वृषभ राशीच्या लोकांसाठी पांढरा, हिरवा व करडा हे रंग शिभ मानले जातात. त्यामुळे या रंगांचे रुमाल वापरणे हे तुमच्यासाठी फलदायी ठरू शकते. या रंगांचा रुमाल तुम्ही तुमच्या खिशात किंवा बॅगमध्ये बाळगावा. (Astro Tips)

Masik Shivratri | आज ‘मासिक शिवरात्री’च्या दिवशी चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी

मिथुन राशी 

मिथुन राशीचा स्वामी हा बुध आहे. त्यानुसार, या राशीच्या लोकांसाठी हिरवा, निळा, आणि जांभळा हे रंग शुभ असतात. या रंगांचे रुमाल जवळ ठेवल्याने तुमची बुद्धी तीक्ष्ण होण्यास मदत होईल.

कर्क राशी 

कर्क राशीचा स्वामी हा चंद्र आहे. त्यानुसार या राशीच्या लोकांसाठी पांढरा, गुलाबी आणि क्रीम हे रंग शुभ आहेत. त्यामुळे या रंगाचा रुमाल वापरणे हे तुमच्यासाठी अतिशय लाभदायक ठरू शकते. या रंगाचे रुमाल वापरल्याने तुमचा समाजात मानसन्मान वाढेल.

सिंह राशी 

सिंह राशीचा स्वामी हा सूर्य आहे. त्यानुसार लाल, पिवळा आणि गुलाबी हे रंग या राशीच्या लोकांसाठी शुभ आहेत. त्यामुळे या रंगाचा रुमाल वापरल्यास त्याचा तुमच्यावर चांगला परिणाम होईल. तसेच या रंगाचे रुमाल वापरल्याने तुमच्यातील नकारात्मकता कमी होईल आणि तुमच्या मनात नेहमी सकारात्मक विचार येतील. (Astro Tips)

कन्या राशी 

कन्या राशीच्या लोकांसाठी हिरवा, निळा, जांभळा आणि पिवळा हे रंग शुभ आहेत. त्यामुळे त्यांनी या रंगाचे रुमाल वापरावे. या रंगाचे रुमाल वापरल्याने तुमची बुद्धी तीक्ष्ण होण्यास मदत होईल.

Shattila Ekadashi | आजच्या ‘षटतिला एकादशी’ला हे उपाय कल्याने होईल धनलाभ

तुळ राशी 

तुळ राशीचा स्वामी हा शुक्र आहे. त्यानुसार, जर तुळ राशीच्या लोकांनी पांढऱ्या रंगासोबत गुलाबी रंगाचा रुमाल जवळ ठेवला तर तुम्हाला धनलाभ होण्यास मदत होऊ शकते. तसेच केवळ धनलाभ नाहीतर तुमच्या करिअरचा आलेखही उंचावत जाईल.

वृश्चिक राशी 

वृश्चिक राशीचा स्वामी हा मंगळ आहे. या राशीच्या लोकांसाठी लाल, गुलाबी, पांढरा आणि करडा हे रंग शुभ आहेत. त्यामुळे त्यांनी या रंगाचा रुमाल वापरणे अतिशय फलदायी ठरू शकते.

धनु राशी 

धनु राशीचा स्वामी हा बृहस्पती आहे. त्यानुसार, जर तुम्हाला आयुष्यात काही अडलेल्या कामात यश मिळवायचे असल्यास तुम्ही पिवळा, लाल, गुलाबी या रंगाचा रुमाल वापरणे अतिशय फायदेशीर ठरणार आहे.

मकर राशी 

शनि मकर राशीचा स्वामी आहे.मकर राशीसाठी नीळा, काळा, जांभळा रंग अतिशय शुभ मानला जातो. हा रंग वापरल्यास तुमच्या करिअरचा आलेख आणखी उंचावेल. (Astro Tips)

कुंभ राशी 

कुंभ राशीचा स्वामी हा शनि आहे. या राशीच्या लोकांसाठी काळा आणि हिरवा हे रंग शुभ मानले जातात. त्यामुळे या राशीच्या लोकांनी या रंगांचे रुमाल वापरल्यास तुमची आर्थिक भरभराट होईल.

मीन राशी 

मीन राशीचा स्वामी हा बृहस्पती आहे. त्यानुसार जर तुम्ही पिवळा, करडा, लाल किंवा पांढऱ्या रंगांचे रुमाल वापरले तर, तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल. (Astro Tips)

(टीप : वरील सर्व बाबी ‘द पॉइंट नाऊ’ हे केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून, याद्वारे आम्ही कोणताही दावा करत नाही.)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here