Skip to content

काय सांगता बीचुकले यांना खुद्द शरद पवार राष्ट्रपती करणार ? ; काय प्रकरण वाचा सविस्तर

Abhijeet Bichukale again for the presidential election

मुंबई : सध्या राज्यात राजकीय पक्ष विधान परिषदेसाठी अखेरची जुळवाजुळव करत आहेत. तर सतत बहुचर्चेत असणारे अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.

त्यासाठी आवश्यक आमदार खासदाराचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादी पक्ष प्रमुख शरद पवार यांच्याविषयी त्यांनी महत्वपूर्ण विधान केलंय. “राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अध्यक्ष शरद पवारांनी पाठिंबा दिला तर आपलं काम सोपं होईल”, असं (Abhijeet Bichukale) बिचुकले म्हणालेत.

हे सुद्धा वाचा : 

औषधा ऐवजी नशेच्या गोळ्या विकणाऱ्या मेडिकल चालकाला पोलिसांनी केली अटक

“राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अध्यक्ष शरद पवारांनी पाठिंबा दिला तर आपलं काम सोपं होईल. पवारांचं आमदार ऐकतात. मला आमदारांच्या सह्या मिळतील आणि माझा राष्ट्रपती होण्याचा मार्ग सोपा होईल. मी राष्ट्पती होऊ शकतो”, असं एका वृत्तवाहिनी संवाद साधताना बिचुकले (Abhijeet Bichukale) म्हणाले.

अभिजित बिचुकले यांनी यापूर्वी राष्ट्रपतीपद, खासदार आणि आमदारकी अशा सर्वप्रकारच्या निवडणुका लढवून झाल्या आहेत. आता अभिजीत बिचुकले यांनी पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत नशीब (Abhijeet Bichukale)आजमवायचे ठरवले आहे.

सातारा येथे वारकऱ्यांच्या गाडीला भीषण अपघात, १ मृत्यू तर ३० जखमी


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!