सैन्यदलातील सैन्य भरतीचा काॅन्ट्रॅक्टर कोण?, जितेंद्र आव्हाड यांचा रोखठोक सवाल 

0
3

ठाणे : सैन्य दलात अग्नीवीर या नावाखाली सैनिकांची भरती केली जाणार आहे. पण, त्यांना सैनिक म्हणू शकत नाही. त्यांना आपण  काॅन्ट्रॅक्ट लेबर असेच म्हणू, पण, त्या काॅन्ट्रॅक्ट लेबर्सचा काॅन्ट्रॅक्टर कोण असेल? असा सवाल गृहनिर्माण व अल्पसंख्यांक (Jitendra Awhad)  मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना मोदी सरकारला विचारला.

 डाॅ.जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले की, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी भाजपची मानसिकता बोलून दाखविली. ते म्हणाले,”जर मला भाजपने सर्व कार्यालयांचा सिक्युरिटी इंचार्ज केला. तर चार वर्षांनंतर जे अग्नीवीर बाहेर पडतील. त्यांना भाजपच्या कार्यालयावर सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी देऊ शकेन. ” म्हणजे काय तर वाॅचमान! या तरूणांचे नेमके काय करायचे ठरवलेय.

दुसरीकडे किशन रेड्डी नावाचे केंद्रीय मंत्री (Jitendra Awhad) म्हणतात, “या चार वर्षात त्यांना नाभिकाचे,  धोब्याचे, ड्रायव्हरचे, इलेक्ट्रिशियनचे ट्रेनिंग मिळेल”. म्हणजे सैन्यात या तरूणांना नाभिक,  धोबी, ड्रायव्हर, इलेक्ट्रिशियन बनविण्यासाठी नेणार आहात काय? हे सर्व सहा महिन्यांचे कोर्स आहेत. भाजपच्या नेत्यांना आणि केंद्रीय मंत्र्यांना अग्निपथ आणि अग्निवीर याबद्दल काहीही माहिती नाही.

हे सुद्धा वाचा :

काय सांगता बीचुकले यांना खुद्द शरद पवार राष्ट्रपती करणार ? ; काय प्रकरण वाचा सविस्तर

हा प्रकार म्हणजे देशातील तरूणांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रयत्न आहे. भारतीय सेना कंत्राटावर चालू शकत नाही. या भूमीवर ज्याचे मनापासून प्रेम आहे; परीक्षेच्या आधी जो तीन तीन वर्ष मेहनत करतो, तो अभ्यास करताना स्वप्न बघतो की आपणाला भारतीय सैन्यात जायचे आहे. त्याच्या स्वप्नांचा (Jitendra Awhad) चुराडा होताना दिसतोय.

सर्वात आधी १३० कोटी जनतेमधून  एक प्रश्न राहिल की, सैन्य दलात जे काॅन्ट्रॅक्ट लेबर कारण आपण त्यांना सैनिक म्हणूच शकत नाही. त्या काॅन्ट्रॅक्ट लेबर्सचा काॅन्ट्रॅक्टर (Jitendra Awhad) कोण असेल? नियमित होणाऱ्या सैन्यभरती थांबवून हे थोतांड सुरू करणे, देशाला घातक ठरेल.

औषधा ऐवजी नशेच्या गोळ्या विकणाऱ्या मेडिकल चालकाला पोलिसांनी केली अटक


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here