औषधा ऐवजी नशेच्या गोळ्या विकणाऱ्या मेडिकल चालकाला पोलिसांनी केली अटक

0
2
Aurangabad crime drug pills News
औषधा ऐवजी नेशेच्या गोळ्या विकणाऱ्या मेडिकल चालकाला पोलिसांनी केले अटक

औरंगाबाद: औरंगाबादमधील पोलिसांचे विशेष पथक आणि वाळूज पोलिसांनी मेडिकल चालक आणि दोन दलालांना अटक करून त्यांच्याकडून नशेच्या तब्बल २०४८ गोळ्या जप्त (Aurangabad crime) केल्या आहे. पोलिसांनी केलेल्या एवढ्या मोठ्या कारवाईनंतर शहरात खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे आतापर्यंत शहरात सुरु असेलला नशेच्यागोळ्याच्या बाजार आता ग्रामीण भागात सुद्धा पसरला असल्याचे सुद्धा या कारवाईनंतर समोर आले आहेत. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात नशेच्या गोळ्या (Aurangabad crime) नेमक्या येतायत कुठून असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

हे सुद्धा वाचा : 

सातारा येथे वारकऱ्यांच्या गाडीला भीषण अपघात, १ मृत्यू तर ३० जखमी

पंढरपूर परिसरातील मेडिकल चालकांकडून गोळ्या विकल्या जात असून त्या गेवराई तांडा परिसरातील तरुण सेवन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी आधी डमी ग्राहकाला पाठवून खात्री केली. त्यांनतर सापळा रचून लांजी रोडवर तारासिंग जगदीशसिंग टाक हा गोळ्या विकण्याच्या तयारीत (Aurangabad crime) असताना पकडले, त्याच्याकडे गोळ‌्या सापडल्या.

तारासिंग याला खाक्या दाखवताच त्याने आधी लांजी रोडवरील शिव मेडिकलचे नाव घेतले. पथकाने तत्काळ मेडिकलचा मालक शिवप्रसाद सुरेश चनघटे याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडेही गोळ्या सापडल्या. त्यांनतर आणखी एका मेडिकल एजन्सीवर काम करणारा महेश उनवणे या गोळ्या पुरवत असल्याचे तारासिंगने सांगताच पथकाने रात्रीतून त्यालाही (Aurangabad crime) ताब्यात घेतले. त्याच्याकडे गोळया सापडल्या. तिघांकडून नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

आसाममध्ये पुराचा कहर, अतिवृष्टीमुळे १० हजारांहून अधिक लोक बेघर


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here