Skip to content

सातारा येथे वारकऱ्यांच्या गाडीला भीषण अपघात, १ मृत्यू तर ३० जखमी

Satara accident Warakaris vehicle crashes

सातारा : कोल्हापूर येथील वारकऱ्यांच्या गाडीला साताऱ्यातील शिरवळ नजीक भीषण (Satara acciden) अपघात झाला. पहाटे तीन वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये 30 वारकरी गंभीर जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : 

आसाममध्ये पुराचा कहर, अतिवृष्टीमुळे १० हजारांहून अधिक लोक बेघर

कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले आणि लाहोटे येथील वारकरी आळंदीला वारीसाठी ट्रॉलीने जात होते. यावेळी साताऱ्यातील शिरवळ नजीक भाजीने भरलेला आयशर टेम्पो पुण्याकडे भरधाव वेगाने जात असताना चालकाचा ताबा सुटून टेम्पोने आधी विद्युत पोलला धडक(Satara acciden) दिली. त्यानंतर गाडीमधून आळंदीकडे निघालेल्या वारकऱ्यांना या टेम्पोने धडक दिली. सर्व वारकरी झोपेत असताना ही घटना घडली आहे.

सर्व जखमींवर शिरवळ व खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्या आले. त्यानंतर गंभीर जखमी रुग्णांना सातारा येथील नाना पाटील रुग्णालयात (Satara acciden) दाखल केले आहे. मय्यप्पा कोंडीबा माने यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अपघात झाल्याची माहिती मिळताच शिरवळ व खंडाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. येथील युवकांनीही जखमींना मदत केली. जखमींची प्रकृती स्थिर असून एक जण गंभीर आहे. त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात (Satara acciden) उपचार सुरू आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्र्यंबकेश्वरच्या दौऱ्यावर


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!