Crime news | कैद्याच्या पोटात महिन्यात दुसऱ्यांदा आढळली चावी

0
10

Crime news |   खुनाच्या गुन्ह्यातील शिक्षा भोगणाऱ्या एका कैद्याच्या पोटात एक महिन्यात दुसऱ्यांदा किल्ली आढळल्याने त्याला ह्या महिनाभरात दुसऱ्यांदा जिल्हा शासकीय रुग्णालयातील ‘प्रिझन वॉर्ड’मध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

बंदिवानाच्या पोटात किल्ली?
या बंदिवानाच्या पोटात किल्ली नेमकी जातेय कोठून? यापूर्वी याची शस्त्रक्रिया झाली होती का? याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनीदेखील काहीही स्पष्ट सांगितलेले नाही. कारागृह प्रशासनाने आता याबाबत चौकशी सुरू केल्याने यापूर्वी घडलेल्या घटनेचे गौडबंगाल काय? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय रामचंद्र सोनवणे (वय ४४, रा. मध्यवर्ती कारागृह) या बंदिवानाच्या पोटात वेदना होत असल्याने त्याला नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मनमाड-येवला मार्गावरील दोन अपघातांत नाशिकचे 5 तरुण; तर पुण्याचा एक जण ठार

ही किल्ली नेमकी कसली?
दरम्यान, (२८ ऑक्टोबर) रोजीदेखील ह्या बंदिवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर सुमारे दोन महिन्यांपूर्वीच या बंदिवानाने ती किल्ली गिळल्याचा संशय व्यक्त केला होता. या बंदिवानाला ही किल्ली मिळाली कोठून?, ही नेमकी कसली किल्ली आहे? त्याने ही किल्ली का गिळली?, किल्ली गिळल्यानंतर इतके दिवस तो शांत कसा राहिला? यासंदर्भातील तपास तेव्हाही करण्यात आला होता.

पण, काही दिवसांनी त्याला पुन्हा कारागृहात पाठविण्यात आले होते. आता पुन्हा २५ नोव्हेंबरपासून ह्या बंदिवानाला जिल्हा रुग्णालयात त्याच वैद्यकीय कारणामुळे दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्याने पुन्हा किल्ली गिळली, की पूर्वी त्याच्यावर उपचारच झाले नव्हते, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारागृह प्रशासनालादेखील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली नसल्याने आता याबाबत शंका-कुशंका उपस्थित होत आहेत.

Nashik | रात्री गारपीट; सकाळी ८ वाजताच पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here