Mahayuti Political | राज्य सरकारकडून अल्पसंख्यांकांना खुश करण्यासाठी सत्ता स्थापनेपूर्वीच मोठा निर्णय घेण्यात आला असून राज्य वक्फ बोर्डाला वेगवेगळ्या पायाभूत सुविधांकरिता 10 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला. महायुती सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वक्फ जमिनीच्या व्यवस्थापनाबाबत चिंता व्यक्त केली होती. त्याचबरोबर वक्फ बोर्डावर अनेक नेते टीका देखील करत होते. परंतु निवडणूक निकालानंतर महायुती सरकारकडून तातडीने वक्फ बोर्डाचे कामकाज व पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.
Mahayuti Political | अखेर तारीख ठरली; ‘या’ दिवशी नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार?
सत्ता स्थापनेपूर्वीच युती सरकारचा मोठा निर्णय
शासनाच्या निर्णयानुसार, 2024-25 या वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाज आणि पुरवणी मागणीद्वारे एकूण 20 कोटी इतकी रक्कम तरतूद करण्यात आलेली असून त्यामधून 2 कोटी अनुदान वक्फ बोर्डाला वितरित करण्यात आले आहे. तर आता 10 कोटी रुपये अदा करण्यात येणार असून वक्फ बोर्डाच्या सक्षमीकरणासाठी हा निधी देण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुका दिवसांपूर्वीच राज्यांमध्ये पार पडल्या असून या निवडणुकांमध्ये महायुतीने बहुमताने विजय मिळवला आहे. त्यानंतर आता काही दिवसांतच सरकारही स्थापन होणार आहे. सध्या एकनाथ शिंदे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असून नव्या सरकारची स्थापना होण्यापूर्वीच युती सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Mahayuti Political | सत्ता स्थापनेपूर्वीच युतीत बिनसलं?; सेना-राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर
सरकारच्या निर्णयाला विश्व हिंदू परिषदेकडून विरोध
दरम्यान, सरकारच्या निर्णयाला विश्व हिंदू परिषदेने विरोध केला होता. काँग्रेस सरकारने जे केले नाही. ते महायुतीचे सरकार करत आहे. सरकार धार्मिक समाजाला खुश करत असून हा निर्णय मागे घेतला नाही. तर स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभेच्या आगामी निवडणुकीत महायुतीला हिंदूंच्या रोशाला सामोरे जावे लागेल.” असा इशारा विहिंपचे कोकण विभागाचे सचिव मोहन सालेकर यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना दिला होता.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम