Dindori | दिंडोरी विधानसभा मतदारसंघाच्या १३ पैकी ११ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

0
22
#image_title

वैभव पगार -प्रतिनिधी : दिंडोरी | दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघात चुरशीने झालेल्या दुरंगी लढतीत महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांनी 44 हजार मतांचे मताधिक्य घेत विजय संपादन केला. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुनीता रामदास चारोस्कर यांना 94 हजार 219 मते मिळाले. या दुरंगी लढतीमधील उमेदवार वगळता इतर सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

Dindori | आज नाशकात ‘इतके’ टक्के मतदान; सर्वाधिक मतदान दिंडोरी मतदारसंघात

11 उमेद्वारांची अनामत रक्कम जप्त

त्यात महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार संतोष रहेरे यांना 4301 मते मिळाली. संतोष रहेरे यांच्यासह 11 उमेद्वारांची अनामत रक्कम जप्त झाली. संतोष माणिक रहेरे 4301, वसंत सुकर शेखरे 402, गोरख साहेबराव गोतरणे 1045, सविता रघुनाथ गायकवाड 1103, सुशिला शिवाजी चारोस्कर 9704, भारत कांतीलाल गायकवाड 725, चंदर नामदेव गायकवाड 1321, योगेश उत्तम भुसार 3619, निवृत्ती आवजी गालट 333, मुरलीधर कृष्णा कनोजे 420, दीपक गणपतराव जगताप 997 मते मिळाल्याने या सर्व 11 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here