Political News | एकनाथ शिंदेंनीच उपमुख्यमंत्री पद घ्यावे भाजपचा आग्रह; काय आहे कारण..? वाचा सविस्तर

0
40
#image_title

Political News | विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आता महायुतीमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असून नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री पद कोणाच्या वाटायला जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. तर एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्मुला असणार असून भाजपला राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच हवे आहेत. अशी सूत्रांची माहिती आहे. तर महायुतीत एकजूट असल्याचा संदेश देण्याकरिता भाजपकडून हा आग्रह धरला गेल्याचेही बोलले जात आहे.

Political News | राणा दाम्पत्याची बच्चू कडूंनी औकातच काढली; म्हणाले, ‘हिंमत असेल तर माझ्याविरोधात…’

दिल्लीतील बैठकीनंतरही मुख्यमंत्री पदाचा पेच कायम

सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीच्या नेत्यांनी काल दिनांक 28 नोव्हेंबर रोजी रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री कोण होणार आणि मंत्रीपदाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती होती. परंतु या बैठकीनंतर देखील मुख्यमंत्री पदाचा तेच सुटलेला नाही. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देण्यात आले होते. तेव्हा भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. आता देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदावर पुन्हा भरणे लागू शकते. असा अंदाज असून त्यांच्या नावे जवळजवळ शिक्कामोर्तब झाल्याच्या चर्चा आहेत. शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्री पद दिले जाणार असल्याच्या चर्चा आहे.

एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री पद घ्यावं याकरिता भाजपा आग्रही

महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार उपमुख्यमंत्री असणार असून हे निश्चित झाले आहे. तर एकनाथ शिंदे यांनी नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करावयासाठी भाजप आग्रही आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये राहिले तर महायुती एकत्र असल्याचा संदेश जनतेत जाईल अशी भाजपाची भूमिका आहे. दरम्यान, सूत्रांच्यामाहितीनुसार, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सामील होण्यास तयार नसून त्यांच्या ऐवजी नवीन व्यक्तीला सामील करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तर एकनाथ शिंदे यांचे श्रीकांत शिंदे यांच्या नावाची ही या पदाकरिता चर्चा सुरू आहे.

Political News | “फक्त मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित करून भागत नाही”; सरकार स्थापनेबाबत बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले

“दोन मराठा उपमुख्यमंत्री असणे हा नकारात्मकपणे संदेश” – संजय शिरसाट

राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, “मुख्यमंत्री राहिल्यानंतर उपमुख्यमंत्री होणे हा मुद्दा नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात अशी उदाहरणे आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अनेक वरिष्ठ नेते उपमुख्यमंत्री राहिले आहेत. पण दोन मराठा उपमुख्यमंत्री असणे हा नकारात्मकपणे संदेश मतदारांपर्यंत जाण्याची भीती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद घेण्याची शक्यता नाही. असे मला वाटते. ते मंत्री होतील व राज्य सरकारमध्ये राहतील.” असे शिंदे सेनेचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here